शिवसेना बेस्ट कामगार सेनेचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेते आणि शिवसेनेचे रॉबिनहूड म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. नितीन नांदगावकर आणि सल्लागार गौरीशंकर खोत यांनी आजी- माजी पदाधिकाऱ्यांसोबत बेस्ट व्यवस्थापक सोनिया सेठी आणि मुंबई महानगरपालिका प्रशासक आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली आणि बेस्ट कामगारांना दिवाळीचा बोनस आणि पगार दिवाळी आधी मिळावा असा आग्रह केला. प्रशासनानेही शिवसेनेच्या नेत्यांचा सन्मान करून त्यांची मागणी मान्य केली आणि बेस्ट कर्मचारी बांधवाना आणि भगिनींना या महिन्यात आगाऊ पगार आणि बोनस देण्यास मान्यता दिली.
advertisement
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी देताच बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष आ. सचिन अहिर आणि सरचिटणीस डॉ. नितीन नांदगावकर कामाला लागले आणि आपल्या पहिल्याच भेटीत बेस्ट प्रशासनाला धारेवर धरून कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळवून दिला. यंदा बेस्ट कर्मचाऱ्यांना येत्या 10 ऑक्टोबर रोजी पगार देण्यात येणार आहे असे आश्वासन बेस्ट प्रशासनाने शिवसेना बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आणि बेस्ट कामगार सेनेने आपले पहिले यश संपादित केले. या प्रसंगी बेस्ट कामगार सेना अध्यक्ष आमदार सचिन अहिर, सरचिटणीस डॉ नितीन नांदगावकर, मार्गदर्शक गौरीशंकर खोत, अनिल कोकीळ, रंजन चौधरी, देवदास कांबळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.