या आगीच्या घटनेचा विविध स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. पर्यावरण संवर्धन आणि पर्यटकांच्या सुरक्षेला धोकादायक ठरणाऱ्या खासगी वाहनांवर आता बंदी घालण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्यान प्रशासनाने उद्यानात विद्युत वाहनं (EVs) सुरू करण्याची हालचाल वेगाने सुरू केली आहे. या वाहनांचा वापर पर्यटकांच्या प्रवासासाठी केला जाणार असून, त्यामुळे भविष्यात खासगी वाहनांना संपूर्ण बंदी घालण्यात येईल.
advertisement
सध्या विद्युत वाहनांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पुढील पंधरा दिवसांत किती वाहने आणायची, त्यांचा वापर कसा करायचा आणि त्यासंबंधीचे इतर तांत्रिक निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यानंतर ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, एकदा ही योजना लागू झाली की पर्यटकांना खासगी वाहनं घेऊन उद्यानात प्रवेश करता येणार नाही. फक्त प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या विद्युत वाहनांमधूनच प्रवास करता येईल.
पूर्वी उद्यानात खासगी वाहनांना बंदी करण्यात आली होती, परंतु तरीही काही वाहनं, विशेषतहा ओम्नीसारखी टॅक्सी, मुख्य प्रवेशद्वारापासून कन्हेरी गुहेपर्यंत प्रवासी सोडत होती. या प्रक्रियेत उद्यान प्रशासनाचा थेट हस्तक्षेप नव्हता. मात्र, आगीच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून आता कोणतेही धोके टाळण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येत आहेत.
विद्युत वाहनांचा वापर केल्याने पर्यावरणाचे प्रदूषण कमी होणार आहे. तसेच जंगलातील प्राण्यांच्या अधिवासावरही नकारात्मक परिणाम होणार नाही. पर्यटकांनाही सुरक्षित व प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल.
संपूर्णतहा पाहता, हा निर्णय पर्यावरण, सुरक्षा आणि पर्यटन या तिन्ही दृष्टीकोनातून सकारात्मक आहे. पुढील काही आठवड्यांत या योजनेची अंमलबजावणी झाली की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध व्यवस्थेत पर्यटकांसाठी खुले राहील.