विमानतळावर आता 'पोलीस सुरक्षा' दुप्पट, 'इतक्या' नवीन वाहतूक पोलीस पदांना मंजुरी
आव्हानाला तोंड देण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सुकर प्रवास अनुभवता यावा, यासाठी राज्य शासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरासाठी 175 नवीन वाहतूक पोलीस पदांची निर्मिती करण्यास मंजुरी दिली आहे.
या175 पदांमध्ये तीन पोलीस निरीक्षकांच्या पदांचा समावेश असून ते विशेषतः विमानतळ परिसरातील वाहतुकीचे नियोजन, मार्गदर्शन आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नियुक्त केले जाणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना प्रवासात झालेल्या कोंडीमुळे निर्माण होणारी असुविधा कमी होण्यास मदत होईल तसेच वाहनचालक आणि प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण होईल.
advertisement
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबरला करण्यात आले होते. सध्या विमानतळ गाठण्यासाठी ठाणे-बेलापूर मार्ग, अटल सेतू तसेच नेरुळ-बेलापूर-उलवे मार्गे प्रवास करता येत आहे. भविष्यात विमानतळाला जोडणारा उन्नत मार्ग देखील तयार केला जाणार आहे, ज्यामुळे या परिसरातील वाहतुकीचा भार आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यामुळे 6 मार्च रोजी नवी मुंबई पोलिसांनी विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी राज्य शासनाकडे पदनिर्मितीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास 29ऑक्टोबर रोजी राज्य शासनाने मंजुरी दिली असून त्यानुसार 175 नवीन वाहतूक पोलीस पदांची निर्मिती केली जाणार आहे.
हा निर्णय प्रवाशांसाठी अत्यंत आनंददायी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरतो. भविष्यातील वाढत्या प्रवासी भाराला तोंड देण्यासाठी आणि विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय निश्चितच मोठा महत्त्वाचा ठरेल.
