लोकल ट्रेनची सेवा पहाटे सुरु होऊन ती रात्री साधारण एक वाजेपर्यंत असते. मात्र आता ही सेवा चक्क प्रवाशांसाठी मध्य रात्री सुरु होणार आहे. ज्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नेव्ही मॅरेथॉन होय.
कारण काय?
मुंबईत होणाऱ्या नेव्ही हाफ मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वे शनिवारी मध्यरात्री दोन विशेष लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने धावपटू सहभागी होणार आहेत, त्यामुळे त्यांना सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.
advertisement
कसे असेल वेळापत्रक?
पहिली विशेष लोकल ही कल्याण स्टेशनवरून रात्री 2:30 वाजता सुटेल आणि ही लोकल सर्व स्थानकांवर थांबत सीएसएमटीला पहाटे 4 वाजता पोहचणार आहे तर हार्बर मार्गावरही एक विशेष लोकल धावणार आहे. ही लोकल पनवेलहून रात्री 2:40 वाजता सुटेल आणि सीएसएमटीपर्यंतचा प्रवास सर्व स्टेशनवर थांबत जाणार असून ही सीएसएमटीवरील पहाटे साधारण 4 वाजता पोहचेल.
