TRENDING:

BMC Elections: कुणाची डब्बल तर कुणाची 9 पट वाढली संपत्ती, मुंबईतील टॉप 12 श्रीमंत उमेदवार!

Last Updated:

पालिकेची निवडणूक लढवणारे उमेदवार हे काही साधेसुधे नाही तर चांगले कोट्याधीश आहे. मुंबईतील माजी नगरसेवक तर चांगलेच गडगंज आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. महायुती आणि ठाकरे बंधूंमध्ये थेट लढत होत आहे. दोन्ही बाजूने आप आपले उमेदवार मैदानात असून प्रचाराला चांगलाच रंग आहे. पण, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत, जी आर्थिक दृष्ट्या एखाद्या राज्याचे बजेट असेल इतकी मोठी महापालिका आहे. त्या पालिकेची निवडणूक लढवणारे उमेदवार हे काही साधेसुधे नाही तर चांगले कोट्याधीश आहे. मुंबईतील माजी नगरसेवक तर चांगलेच गडगंज आहे. तर आताच आयात झालेल्या उमेदवारांची संपत्तीही डोळे पांढरी करणारी आहे.
BMC Elections
BMC Elections
advertisement

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपलं प्रतिज्ञपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केलं आहे. त्यामुळे आपल्यााकडे असलेल्या संपत्तीची माहिती प्रत्येक उमेदवाराला द्यावी लागते. आता या उमेदवारांची संपत्ती किती आहे ते समोर आलं आहे.  माजी महापौरांसह माजी नगरसेवकांनी मालमत्तेतील झपाट्याने झालेली वाढ मतदारांच्या कुतूहलाचा विषय निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उघड झालं आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीत २२७ प्रभागासाठी तब्बल १७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्याममध्ये सगळ्या श्रीमंत असल्याचा मान हा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांना मिळाला आहे. समाधान सरवणकर यांच्याकडे तब्बल ४६ कोटी ५९ लाख इतकी संपत्ती आहे. तर त्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार आणि माजी महापौर श्रद्धा जाधव एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता ४६ कोटी इतकी आहे.

advertisement

कोणाची किती संपत्ती वाढली

माजी महापौर किशोरी पेडणेकर एकूण मालमत्ता - यांची ५ कोटी २६ लाख

२०१७ साली - १ कोटी ६१ लाख ५३ हजार रुपये होती.

माजी महापौर श्रद्धा जाधव (वॉर्ड क्रमांक २०२)

एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता : ४६ कोटी

विधानसभा निवडणूक २०२४ लढवली होती. त्यावेळी एकूण मालमत्ता ४४ कोटी होती

advertisement

वाढ : एका वर्षात २ कोटी

माजी महापौर विशाखा शरद राऊत (प्रभाग क्र. १९१)

स्थावर - जंगम मालमत्ता: २१ कोटी८३ लाख

२०१७ मध्ये : १४ कोटी ३७ लाख

वाढ : ७ कोटी

---------------------

यामिनी जाधव (प्रभाग २०९)

एकूण मालमत्ता : १४ कोटी ५७ लाख

विधानसभा २०२४ लढवली : १० कोटी१० लाख

advertisement

वाढ : १ वर्षात ४ कोटी

----------------------

नील किरीट सोमय्या (प्रभाग क्र. १०७)

एकूण मालमत्ता : ९ कोटी

२०१७ मध्ये : १ कोटी ९९ लाख

वाढ : ८ वर्षात ७ कोटी

----------------------

तेजस्वी अभिषेक घोसाळकर (प्रभाग क्र. २)

एकूण मालमत्ता : ५ कोटी

२०१७ मध्ये : २५ लाख

वाढ : ८ वर्षात ४. ७५ कोटी

advertisement

----------------------

शैलेश फणसे - एकूण मालमत्ता २५ कोटी

दीप्ती वायकर - २२ कोटी १ लाख ७१ हजार

----------------------

समाधान सरवणकर -- ४६ कोटी ५९ लाख

२०१७ मध्ये - ९ कोटी ४३ लाख

----------------------

यशवंत किल्लेदार एकूण मालमत्ता - ७ कोटी ५ लाख

----------------------

रवी राजा एकूण मालमत्ता - १० कोटी १२ लाख १७ हजार

२०१७ मध्ये - ५ कोटी १२ लाख ८४ हजार

----------------------

भाजपचे उमेदवार प्रभाकर शिंदे एकूण मालमत्ता - १७ कोटी ६३ लाख रुपये

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात घडलं! 'मफिन'ला मिळालं नवं आयुष्य,श्वानावर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी Video
सर्व पहा

----------------------

मराठी बातम्या/मुंबई/
BMC Elections: कुणाची डब्बल तर कुणाची 9 पट वाढली संपत्ती, मुंबईतील टॉप 12 श्रीमंत उमेदवार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल