दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची बातमी आहे. 27 जानेवारी 2026 पासून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 आहे. ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया होणार असून कामगार पदासाठी 38 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. कामगार पदासाठी दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आहे. अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची असून पेमेंट सुद्धा ऑनलाईनच पद्धतीने करायची आहे. पेमेंट केल्यानंतरच तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.
advertisement
खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये फी असणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे. कामगार पदासाठी 22 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे 18 ते 38 वर्षे पूर्ण असलेले हवे. तर, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षाची वयोमर्यादेत सूट असणार आहे. अर्ज करण्यापू्र्वी अर्जदाराने एका जाहिरातीची PDF वाचायची आहे, त्याप्रमाणेच तुम्ही अर्ज भरण्याचा सल्ला मुंबई महानगर पालिकेकडून अर्जदारांना देण्यात आला आहे. बातमीमध्ये अर्जदारांना जाहिरातीच्या PDF सोबत ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक सुद्धा देण्यात येत आहे.
