मुंबई उच्च न्यायालयामध्ये लघुलेखक (Stenographer) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने नोकरभरती केली जात आहे. लघुलेखक (उच्च श्रेणी) आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) अशा दोन पदांसाठी ही नोकरभरती केली जात आहे. एकूण 30 पदांसाठी ही नोकर भरती केली जात असून या दोन्हीही पदांसाठी वेगवेगळ्या जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 30 पदांसाठी केली जाणारी ही नोकरभरती लघुलेखक (उच्च श्रेणी) पदासाठी 15 जागांवर आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) पदासाठी 15 जागांवर नोकरभरती केली जाणार आहे.
advertisement
लघुलेखक (उच्च श्रेणी) पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे, शॉर्ट हँड 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. येणे आवश्यक आहे. तर, लघुलेखक (निम्न श्रेणी) पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे, शॉर्ट हँड 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. येणे आवश्यक आहे. दोन्हीही पदासाठी वयोमर्यादा किमान 21 वर्षे आणि कमाल 38 वर्षे इतकी आवश्यक आहे. आरक्षण असलेल्या उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा आहे. हे नोकरीचं ठिकाण मुंबई आहे.
इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी एकदा आवश्य जाहिरातीची PDF वाचावी. लघुलेखक (उच्च श्रेणी) आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) अशा दोन्ही पदांसाठीची जाहिरात वेगवेगळी आहे. दोन्हीही पदांची जाहिरात PDF इच्छुकांना बातमीमध्ये देण्यात येत आहे. ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांना सर्वात प्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जायचं. वेबसाईटची विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला BHC New Website नावाचा एक पर्याय दिसेल, त्याच्या खाली Recruitment नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर दोन्हीही पदांसाठीची जाहिरात, कॅरेक्टर सर्टिफिकेटचा फॉर्म आणि ऑनलाईन फॉर्मची लिंक सुद्धा इथे उपलब्ध असेल.
27 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेसाठी शेवटचा दिवस 10 नोव्हेंबर 2025 हा असेल. 10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. परीक्षेचा अर्ज भरण्याची आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकच असणार आहे. परीक्षा शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. 1000 रूपये परीक्षा शुल्क असणार आहे. हे शुल्क सर्वांसाठी सारखेच आहे. 49,100 ते 1,77,500 पर्यंत दोन्हीही पदांसाठी पगार असेल.
