Health Tips : संपूर्ण शरीराची त्वचा कोरडी पडतेय? काय उपाय करावा? डॉक्टरांनी सांगितल्या महत्त्वाच्या टिप्स
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
हिवाळा सुरू झाला की, संपूर्ण शरीराची त्वचा रखरखीत होते. त्यामुळे खाज येणे, बारीक पुरळ येणे अशा समस्या उद्भवतात. आपल्या घरी उपलब्ध असलेलं प्रॉडक्ट वापरून तुम्ही हिवाळ्यात त्वचा मुलायम ठेवू शकता.
अमरावती: हिवाळा सुरू झाला की, संपूर्ण शरीराची त्वचा रखरखीत होते. त्यामुळे खाज येणे, बारीक पुरळ येणे अशा समस्या उद्भवतात. यासाठी अनेकजण महागडे लोशन वापरतात. तरीही काही वेळानंतर त्वचा जशीच्या तशी झालेली दिसते. अशावेळी यावर एक साधा आणि सरळ उपाय आहे. आपल्या घरी उपलब्ध असलेलं प्रॉडक्ट वापरून तुम्ही हिवाळ्यात त्वचा मुलायम ठेवू शकता. ते प्रॉडक्ट नेमकं कोणतं? कसं वापरायचं? याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे आपल्या त्वचेला खाज सुटते आणि अनेक समस्या निर्माण होतात. त्यासाठी एकच सोपा आणि घरगुती उपाय आहे तो म्हणजे संपूर्ण शरीराला खोबरेल तेल लावणे. पण खोबरेल तेल लावताना ते अंघोळ झाल्यावर ओल्या अंगावर लावावे. त्यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो.
advertisement
खोबरेल तेल ओल्या अंगावर लावावे
अंग कोरडे करून तेल लावल्यास ते दीर्घकाळ टिकत नाही. त्वचा कोरडी होऊन खाज सुटते. त्यामुळे खोबरेल तेल ओल्या अंगावर लावावे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुम्ही पॅराफीन असलेले, एलोवेरा असलेले मॉइश्चरायझर सुद्धा अंगाला लावू शकता. ते सुद्धा लावताना ओलसर अंगावर लावावे, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
त्वचा नरम राहण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त
view commentsहिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार प्रॉडक्ट वापरणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला त्वचेच्या समस्या नेहमी नेहमी उद्भवत नाहीत. हिवाळ्यात अंगाला खोबरेल तेल लावणे कधीही फायद्याचे आहे. त्याने त्वचा नरम राहते आणि उलत नाही, असेही डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
October 29, 2025 7:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : संपूर्ण शरीराची त्वचा कोरडी पडतेय? काय उपाय करावा? डॉक्टरांनी सांगितल्या महत्त्वाच्या टिप्स

