नोव्हेंबर महिन्यात थंडीची सुरुवात होते आणि याच काळात स्किन जास्त ड्राय होते. स्किन ड्राय असेल तर कितीही महाग फेशियल केले तरी चेहऱ्यावर तितका परिणाम दिसत नाही. त्यामुळे नियमित स्किन केअर रुटीन ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्या सांगतात
फेमस ब्युटिशियन सोनाली सोनी यांनी दिलेल्या स्किन केअर टिप्स
1. लग्नाच्या 3- 4 महिने आधीपासून फेशियल सुरू करा. महिन्यातून एकदा हलकं फेशियल करा. पहिल्यांदाच नवीन ट्रीटमेंट करण्याऐवजी आधी स्किनला सूट होणारी पद्धत निवडा. मसाज केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते.
advertisement
2. रोजचा मॉइश्चरायझर कधीही चुकवू नका. संध्याकाळी झोपायच्या आधी मॉइश्चरायझर लावणे खूप महत्त्वाचे आहे. स्किन ड्राय असेल तर ग्लो अजिबात टिकत नाही.
3. बाहेर जाताना हलकं CC क्रीम वापरा हे त्वचेला समतोल दिसायला मदत करते. फक्त भारी मेकअपच्या मागे लागू नका, स्किनला श्वास घेऊ द्या.
4. आठवड्यातून 2 वेळा बेसन, दही आणि हळदीचा हलका फेसपॅक. काकडीचा रस किंवा गुलाबपाणी स्प्रे म्हणून वापरता येतो. चेहरा कोरडा वाटत असेल तर नारळाचे किंवा बदामाचे तेल रात्री वापरता येते. असा दररोज घरगुती उपाय करा.
5. पाणी आणि झोप याकडे दुर्लक्ष करू नका. दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे. झोप कमी असेल तर चेहऱ्यावर तेज दिसत नाही.
6. लग्नाच्या दिवशी ग्लो टिकवायचा असेल तर चेहऱ्यावर नवीन उत्पादने वापरू नका. तसेच जास्त घासाघीस सुद्धा करू नका. मेकअप करण्याच्या आधी स्किनला व्यवस्थित हायड्रेट करा. भारी फेशियल लग्नाच्या दोन–तीन दिवस आधी करू नका; स्किन रिऍक्ट होण्याची शक्यता असते.