नव्या वर्षात लोकल सेवांमध्ये मोठा बदल
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य मार्गावर साधारण 10 ते 12 अतिरिक्त लोकल फेऱ्या चालवण्याचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. यासोबतच 15 डब्यांच्या अतिरिक्त लोकल गाड्याही सुरू केल्या जाणार आहेत, ज्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना अधिक जागा मिळेल.
हार्बर मार्गावर एसी लोकल धावणार?
एवढेच नाही तर हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही आनंदाची बातमी मिळाली आहे. ज्यात रेल्वे बोर्डाने एसी लोकल चालवण्याची परवानगी दिल्यामुळे हार्बरवरील प्रवाशांना लवकरच प्रवाशांना थंडगार, आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. नेरूळ-उरण मार्गावरही 10 फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत.
advertisement
मुख्य मार्गावर फेऱ्या वाढविण्यासाठी काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनसकडे वळवण्यात येणार आहेत, ज्यामुळे लोकल सेवेत सुधारणा होईल आणि प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढवता येईल. याशिवाय 15 डब्यांच्या लोकल गाड्या चालवण्यासाठी मुंबईतील तब्बल 34 स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम सुरु आहे. त्यापैकी 27 स्थानकांची लांबी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. यामुळे 12 डब्यांच्या सुमारे 10 लोकल गाड्या आता 15 डब्यांमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत.
सध्या मध्य रेल्वेवर 1810 तर पश्चिम रेल्वेवर 1406 फेऱ्या चालवल्या जात आहेत.पण आता नव्या सुधारित वेळापत्रकासह आणि अतिरिक्त फेऱ्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांना गर्दी कमी होऊन प्रवास अधिक आरामदायी, जलद आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
