गणेशभक्तांची संख्या लक्षात घेता त्यांच्या सोयीसाठी विविध स्थानकांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. चिंचपोकळी, करी रोड, भायखळा, परळ, दादर, कॉटन ग्रीन, वडाळा रोड, ठाणे आणि पनवेल या स्थानकांवर एकूण 30 मोबाइल-यूटीएस मशीन तैनात करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना तिकिटे घेणे अधिक सोयीचे होणार आहे. त्याचप्रमाणे यूटीएस अॅपच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी 10 दिवसांकरिता प्रमोशनल टीमही या स्थानकांवर कार्यरत असेल.
advertisement
RTO Radar: वेगाशी स्पर्धा कराल तर खिसा रिकामा होणार! आरटीओ करणार 'रडार' सिस्टीमचा वापर
चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर दोन अतिरिक्त यूटीएस तिकीट खिडक्या उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे गर्दीचा ताण कमी होईल आणि तिकीट खरेदी करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार नाही. याशिवाय प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि योग्य माहिती मिळवून देण्यासाठी अतिरिक्त सहाय्यकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
गणपती स्पेशल गाड्यांची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचावी यासाठी CSMT, दादर, ठाणे, LTT, दिवा, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर ठिकठिकाणी बॅनर आणि माहिती फलक लावण्यात आले आहेत. या गाड्यांची माहिती वर्तमानपत्रांमधून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दिली जात आहे.
घोषणांची अचूकता आणि सातत्य राखण्यासाठी मुख्य व्यावसायिक निरीक्षक केंद्रीय घोषणा कक्षात तैनात करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना वेळोवेळी योग्य माहिती मिळणार असून त्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुसह्य होईल.