TRENDING:

पूजा, दिवाळी, छठसाठी मध्य रेल्वेच्या 1126 विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Last Updated:

पूजा, दिवाळी आणि छठ 2025 उत्सवानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यावर्षी एकूण 1126 विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पूजा, दिवाळी आणि छठ 2025 उत्सवानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यावर्षी एकूण 1126 विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. यापैकी 944 विशेष गाड्या यापूर्वी जाहीर झाल्या होत्या. आता प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी 182 विशेष गाड्या चालवल्या जाणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले.
पूजा, दिवाळी व छठ 2025 साठी मध्य रेल्वेच्या 1126 विशेष गाड्या
पूजा, दिवाळी व छठ 2025 साठी मध्य रेल्वेच्या 1126 विशेष गाड्या
advertisement

नव्याने जाहीर झालेल्या 182 विशेष गाड्या

प्रवाशांना उत्तर भारतासह विविध राज्यांमध्ये सोयीस्कर प्रवास करता यावा, यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनसहून दानापूर, मऊ, बनारस व करीमनगर मार्गांवर या गाड्या चालवल्या जाणार आहेत.

1) लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष (40 सेवा)

गाडी क्र. 01017 : 27 सप्टेंबर 2025 ते 01 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रत्येक सोमवार व शनिवारी दुपारी 12.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री 10.45 वाजता दानापूर येथे पोहोचेल.

advertisement

गाडी क्र. 01018 : 29 सप्टेंबर 2025 ते 03 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रत्येक सोमवार व बुधवारी रात्री 12.30 वाजता दानापूर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी 12.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, गोविंदपुरी, फतेहपूर, सुभेदारगंज, पं. दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर आणि आरा.

advertisement

संरचना: 2 वातानुकूलित द्वितीय, 8 वातानुकूलित तृतीय, 4 शयनयान, 6 सामान्य द्वितीय, 1 गार्ड ब्रेक व्हॅन व 1 जनरेटर कार.

2) लोकमान्य टिळक टर्मिनस – मऊ – लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष (40 सेवा)

गाडी क्र. 01123 : 26 सप्टेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान प्रत्येक शुक्रवार व रविवारी दुपारी 12.15 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 05.35 वाजता मऊ येथे पोहोचेल.

advertisement

गाडी क्र. 01124 : 28 सप्टेंबर 2025 ते 02 डिसेंबर 2025 दरम्यान प्रत्येक रविवार व मंगळवारी सकाळी 07.35 वाजता मऊ येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 10.20 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, गोविंदपुरी, फतेहपूर, सूबेदारगंज, मिर्झापूर, वाराणसी, जौनपूर आणि औड़िहार.

advertisement

संरचना: 2 वातानुकूलित द्वितीय, 8 वातानुकूलित तृतीय, 4 शयनयान, 6 सामान्य द्वितीय, 1 गार्ड ब्रेक व्हॅन व 1 जनरेटर कार.

3) लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष (40 सेवा)

गाडी क्र. 01051 : 24 सप्टेंबर 2025 ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान प्रत्येक बुधवार व गुरुवारी दुपारी 12.15 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 01.10 वाजता बनारस येथे पोहोचेल.

गाडी क्र. 01052 : 26 सप्टेंबर 2025 ते 29 नोव्हेंबर 2025 दरम्यान प्रत्येक शुक्रवार व शनिवारी सकाळी 06.35 वाजता बनारस येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 04.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, गोविंदपुरी, फतेहपूर, सुभेदारगंज, मिर्झापूर आणि वाराणसी.

संरचना: 2 वातानुकूलित द्वितीय, 8 वातानुकूलित तृतीय, 4 शयनयान, 6 सामान्य द्वितीय, 1 गार्ड ब्रेक व्हॅन व 1 जनरेटर कार.

4) लोकमान्य टिळक टर्मिनस – करीमनगर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (06 सेवा)

गाडी क्र. 01067 : 23 सप्टेंबर 2025 ते 07 ऑक्टोबर 2025 दरम्यान प्रत्येक मंगळवारी दुपारी 03.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 08.30 वाजता करीमनगर येथे पोहोचेल.

गाडी क्र. 01068 : 24 सप्टेंबर 2025 ते 08 ऑक्टोबर 2025 दरम्यान प्रत्येक बुधवारी सायं. 05.30 वाजता करीमनगर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 01.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, नागर्सोल, औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, निजामाबाद, मेटपल्ली आणि कोरुटला.

संरचना: 1 वातानुकूलित प्रथम, 1 वातानुकूलित द्वितीय, 5 वातानुकूलित तृतीय, 8 शयनयान, 4 सामान्य द्वितीय, 1 गार्ड ब्रेक व्हॅन व 1 जनरेटर कार.

आरक्षणाची सुरुवात

गाडी क्रमांक 01017, 01123, 01051, 01067, 01411, 01403 आणि 01405 या गाड्यांचे आरक्षण 14 सप्टेंबर 2025 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in

वर सुरू होईल.

प्रवाशांनी थांबे व वेळापत्रकाबाबत अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in

या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES App डाउनलोड करावा, असे मध्य रेल्वेकडून आवाहन करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
पूजा, दिवाळी, छठसाठी मध्य रेल्वेच्या 1126 विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल