चंद्रशेखर बावनकुळेंनी आरोप फेटाळले
मी मागच्या 34 वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक जीवनात आहे. मी विधिमंडळात 20 वर्षांपासून आहे. मी चारवेळा निवडून आलो. अशा फोटोच्या आधारावर कुणाची इमेज खराब करता येत नाही. कुणी हा प्रयत्न केला आहे, त्याला लखलाभ. संघर्ष करून आम्ही आमची इमेज तयार केली आहे. मागील दीड वर्षांपासून मी घरच्यांना वेळ दिला नव्हता. दिवाळीत माझ्या परिवाराने 3 दिवसांसाठी माझा वेळ घेतला आणि आम्ही फिरायला गेलो. मात्र, काहींनी व्यक्तीगत टीका करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
आम्हाला याचे वाईट वाटलं. कुठल्याही हॉटेलला गेलो तर कसिनोमधूनच क्रॉस करून जावं लागतं. मकाऊ आणि हाँगकाँगला असे कुठलेच हॉटेल नाही. एक लाख देखील तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. हे काय म्हणतात 3 कोटी रुपये. माझे विदेशात कुठलेही मित्र नाही आणि बँक अकाऊंट नाही. कधी काळी ज्यांनी हे विदेशात पैसे ठेवले असतील, काळा धन गोळा करणे यांच्याकडून मला आता समजून घ्यावे लागेल. तीन कोटी कसे घेऊन जातात, असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊत यांच्यावर केला आहे.
मराठा समाजाला आरक्षणा मिळणार : बावनकुळे
एकनाथ शिंदे यांनी ठरवले आहे, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचे आहे. ओबीसी मराठा संघर्ष सुरू आहे, तो कुणाला परवडणारा नाही. राज्याचे सामाजिक वातावरण पुढे नेण्याची आमची जबाबदारी आहे. राज्यात सर्वच लोक गुण्या गोविंदाने रहावे, असं आम्हाला वाटतं.
राहुल गांधी बद्दल काय बोलावे याचे उत्तर जनतेने सोशल मीडियावर दिलं आहे. राहुल गांधी यांना मानसिक रोग झाला आहे. मोदींचे तळपणारे नेतृत्व या देशाने पाहिले आहे. निराश अवस्थेत राहुल गांधी बोलले, अशी टीका बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.
वाचा - आमदार अपात्रतेसंबंधी ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंची उलटतपासणी, सुनावणीवेळी खडाजंगी
महायुतीत ज्या पद्धतीने सर्व स्ट्राँग आहे ते पाहिले तर हजार हत्तीचे बळ या सरकारमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांच्या सारखा मर्द मराठा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे इथे सर्वच शेर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेला येत्या काळात माणसे दिसणार नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले.
पुढच्या काळात देवेंद्र फडणवीस यांची यात्रा राज्यात होईल. त्याचे आम्ही नियोजन करतोय. आजचे शिबिर हे त्याचसाठी होते. मोदी सरकारच्या योजना आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या दीड वर्षांपासून जी तयारी सुरू आहे त्याचा आढावा आज आम्ही घेतोय. 45 खासदार आमचे असतील यासाठी हे प्रशिक्षण आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
