आश्विन आगवणे यांची पोस्ट काय आहे?
आश्विन आगवणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट लिहित तत्कालीन भाजप सरकारचे जाहीर आभार मानले आहे. "आज LL.B. अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला आणि अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन, मी देशातील पहिला अनाथ वकील झालो. 2018 साली महाराष्ट्रात अनाथांना देशातील प्रथम आरक्षण मिळाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी महीला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि श्रीकांत भारतीय यांचे आभार" अशी पोस्ट आश्विन आगवणे यांनी लिहिली आहे.
advertisement
देवेंद्र फडणवीस यांनीही दिली प्रतिक्रिया
आश्विन यांच्या पोस्टला रिपोर्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. "अनाथांना आरक्षण निर्णय देण्याची संधी मला मिळाली आणि त्यातून अनेकांना लाभ झाला. अनाथांना आरक्षण देण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. आता तर आम्ही अनाथांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आश्विन आगवणे यांनी अतिशय कष्टाने आणि जिद्दीने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि ते या वर्गवारीचा लाभ घेत देशातील पहिले वकील बनू शकले. प्राध्यापक तर होतेच, आता अॅडव्होकेट सुद्धा झाले. महाराष्ट्राच्या या सुपुत्राचे अतिशय मनापासून अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी अतिशय मनापासून शुभेच्छा. आश्विनला मी एकच सांगीन, ज्यांना कुठूनच मदत मिळत नाही, कायम त्यांच्या मदतीला धावून जा. तीच खरी ईश्वरसेवा आहे. तीच खरी मानवसेवा आहे आणि तीच खरी देशसेवा आहे", अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.