एमएमआरडीएने ठरवले आहे की हा भुयारी मार्ग प्रकल्प खरेदी करणे किंवा बांधणे परवडेल का हे तपासण्यासाठी एका तज्ञाची नियुक्ती केली जाईल. मंगळवारी निविदा प्रसिद्ध केल्या असून इच्छुक कंपन्या 10 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान निविदा सादर करू शकतात. निविदा प्रक्रियेनंतर सल्लागाराची नियुक्ती केली जाईल आणि सात महिन्यांच्या कालावधीत त्यांना भुयारी मार्गाच्या व्यवहार्यतेचा अहवाल तयार करून एमएमआरडीएला सादर करावा लागेल.
advertisement
कसा असेल हा प्रकल्प?
हा प्रकल्प सुमारे 16 किलोमीटर लांब असून भुयारी मार्ग चार पदरी असेल. प्रकल्पासाठी अंदाजित खर्च सुमारे 2,400 कोटी रुपये आहे. या मार्गामुळे प्रवाशांना वेळेची बचत होईल तसेच मुंबईतील विविध वाहतूक प्रणालींचे एकत्रीकरण अधिक प्रभावी होईल.
या आधीचे हे आहेत प्रकल्प
मुंबईत आधीही ठाणे-बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या मार्गांवर भुयारी मार्गाचे प्रकल्प सुरू केले गेले आहेत. आता या प्रकल्पानंतर तिसरा भुयारी मार्ग वरळी ते मुंबई विमानतळ, बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक मार्गावर बांधण्याचे निश्चित झाले आहे. तसेच भविष्यात चेंबूर ते बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक आणि बांद्रा रिक्लेमेशन ते बीकेसी मार्गावर स्वतंत्र भुयारी मार्गाची शक्यता देखील आहे.
भुयारी मार्ग प्रकल्प शहरातील मुख्य व्यवसायिक केंद्रे, हवाई टर्मिनल, बुलेट ट्रेन स्थानके आणि उपनगरांना जोडून प्रवास अधिक जलद आणि सुलभ करेल. यातून वाहतुकीची अडचण कमी होईल, प्रदूषण कमी होईल आणि इंधनाची बचतही होईल. मुंबईतील सध्याच्या समुद्रकिनारी रस्ता, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक प्रणालींसह हा भुयारीहा मार्ग दुसऱ्या रस्त्यामध्ये समाविष्ट केला जाईल, ज्यामुळे शहरातील प्रवास अधिक सोईस्कर होईल.
एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे की सल्लागार नियुक्तीनंतर व्यवहार्यता अभ्यासासाठी मार्गाचे भौगोलिक, तांत्रिक, आर्थिक आणि पर्यावरणीय सर्व पैलूंचा सखोल अभ्यास केला जाईल. त्यानंतर प्रकल्पाची अंतिम आखणी आणि रस्ता बांधकामासाठी पुढील टप्प्याचा निर्णय घेण्यात येईल.
मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी हा भुयारी मार्ग प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि व्यस्त भागांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच प्रवाशांना जलद आणि सुरक्षित प्रवास देण्यासाठी हा प्रकल्प मोठा टप्पा ठरेल. एकूणच वरळी ते मुंबई विमानतळ भुयारी मार्ग प्रकल्प मुंबईत शहरातील वाहतूक व्यवस्थापनात क्रांतिकारी बदल घडवून आणेल तसेच प्रवाशांचा वेळ वाचवेल आणि शहरातील आर्थिक आणि औद्योगिक केंद्रांना सहज जोडेल.