शाळांना इतक्या दिवस असणार सुट्टी
या वर्षी दिवाळी 20 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी होणार आहे. काही ठिकाणी 21 ऑक्टोबरलाही दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे राज्यनिहाय सुट्ट्यांमध्ये थोडा फरक दिसून येतो. राजस्थानमध्ये शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शाळा 13 ऑक्टोबरपासून 24 ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. म्हणजेच मुलांना जवळपास अकरा दिवसांची मोठी सुट्टी मिळणार आहे. पालकांना मुलांसोबत प्रवास किंवा नातेवाईकांकडे जाण्याची ही एक चांगली संधी आहे.
advertisement
कर्नाटकात इतक्या दिवस सुट्टी
कर्नाटकात दिवाळीच्या सुट्ट्या 8 ऑक्टोबरपासूनच सुरू झाल्या आहेत. तेथील शाळा 18 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. दिवाळी सोमवारच्या दिवशी येत असल्याने मुलांना या वेळेस दहा दिवसांची मोठी सुट्टी मिळाली आहे. उत्तर प्रदेशात शाळा 20 ऑक्टोबरपासून 23 ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. त्यामुळे मुलांना सलग पाच दिवस विश्रांतीचा आनंद मिळणार आहे.
बिहारमध्ये किती दिवस असणार सु्ट्टी
बिहारमध्ये दिवाळीबरोबरच छठ पूजेच्या सुट्ट्याही मिळाल्या आहेत. तेथे शाळा 20 ऑक्टोबरपासून 28 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. म्हणजेच जवळपास नऊ दिवसांची मोठी सुट्टी मिळाली आहे. महाराष्ट्रात शाळांना 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबरपर्यंत सुट्टी मिळणार आहे. काही शाळांनी गोवर्धन पूजा आणि भाऊबीजच्या दिवशीही सुट्टी दिली आहे. त्यामुळे मुलांना सात ते आठ दिवसांचा विश्रांतीचा काळ मिळतो आहे. या काळात अनेक कुटुंबे आपल्या गावाला किंवा पर्यटनस्थळी जाण्याचा प्लॅन करत आहेत.
आंध्र प्रदेश अन् तेलंगणात इतक्या दिवस सुट्टी
आंध्र प्रदेश आणि तेलंगणात 18 आणि 19 ऑक्टोबर हे शनिवार आणि रविवार असल्याने सुट्टी आहे. त्यानंतर 20 ऑक्टोबरला दिवाळी असल्यामुळे आणखी एक सुट्टी मिळणार आहे. काही शाळांनी 21 ऑक्टोबरलाही सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे चार ते पाच दिवसांचा सुट्टीचा कालावधी मिळतो आहे.
दिल्लीमध्ये इतक्या दिवस सुट्टी
दिल्लीमध्ये काही लोक 20 ऑक्टोबरला आणि काही लोक 21 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करणार आहेत. त्यामुळे सुट्ट्या दोन दिवसांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. शनिवार, रविवार आणि सोमवार मिळून तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. काही शाळांमध्ये गोवर्धन पूजा आणि भाऊबीजच्याही दिवशी सुट्टी दिली आहे. त्यामुळे एकूण पाच दिवस सलग सुट्टी मिळत आहे.
बँकांना किती दिवस असणार सुट्ट्या
बँकांच्याही सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित काम असेल तर ते दिवाळीपूर्वीच पूर्ण करून घ्या. कारण दिवाळी, छोटी दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीजच्या दिवशी अनेक ठिकाणी बँका बंद राहतील. या वेळी आरबीआयने 21, 22 आणि 23 ऑक्टोबरला विविध राज्यांमध्ये बँकांना सुट्टी दिली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार आधीच पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
एकूणच पाहता या वर्षीची दिवाळी सुट्ट्यांनी भरलेली आहे. मुलांना अभ्यासापासून विश्रांती, पालकांना घरातील सणांची तयारी आणि सगळ्यांना एकत्र वेळ घालवण्याची उत्तम संधी मिळाली आहे.