World Sight Day : काहीच होत नाही म्हणून रडत बसणाऱ्यांनी नक्की पाहावं! अंध असून रिना पाटील आहे बँक कर्मचारी, परदेशातही गेल्या!

Last Updated:

हा दिवस अंध आणि कमी दृष्टी असलेल्या लोकांसाठी जागरूकता पसरवण्याचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा दिवस आहे.

+
अंध

अंध व्यक्ती दिसत नसतानाही सर्व कामे कशी करतात?

पुणे : दरवर्षी आपण 15 ऑक्टोबरला 'वर्ल्ड व्हाईट केन डे', म्हणजेच जागतिक पांढरी काठी दिवस, साजरा करतो. हा दिवस अंध आणि कमी दृष्टी असलेल्या लोकांसाठी जागरूकता पसरवण्याचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा दिवस आहे. अंध व्यक्तींना त्यांच्या रोजच्या आयुष्यात अनेक संघर्ष करावे लागतात, पण मोठ्या धैर्याने ते स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करत असतात. बसमध्ये प्रवास करण्यापासून ते आधुनिक टेक्नॉलॉजी वापरण्यापर्यंत, अंध व्यक्ती अनेक गोष्टी स्वतःच करतात. अनेकांना हा प्रश्न पडतो की, दिसत नसतानाही ते हे कसे करतात. याविषयी माहिती रीना पाटील यांनी लोकल 18 ला दिली आहे.
रीना पाटील पूर्णपणे डोळ्याने अंध आहेत. त्या मूळच्या सांगलीच्या असून त्यांनी इंग्रजी विषयात पदवी घेतली आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्या बँक ऑफ बडोदामध्ये काम करत आहेत. एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच त्या त्यांचे आयुष्य जगत आहेत. पण खास गोष्ट म्हणजे, त्या फक्त भारतातच नव्हे तर अमेरिका, कुवेतसारख्या देशांमध्येही गेल्या आहेत. त्या नेहमीच समाजासाठी काम करत राहतात. सरकारच्या योजना समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि शिक्षणासाठी मदत करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
advertisement
रीना पाटील यांनी सांगितले की, मी अंध असूनही आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करते. अंध व्यक्ती दुसऱ्यांवर अवलंबून न राहण्यासाठी अनेक टेक्नॉलॉजीचा उपयोग करतात. त्यांनी सांगितले की, मी ब्लूटूथ कीबोर्ड डिव्हाइस वापरते. याच्या माध्यमातून मी माझा मोबाईल सहजपणे ऑपरेट करू शकते. माझ्या मोबाईलमध्ये Talk Back नावाचे ॲप आहे. या ॲपचा वापर केल्यावर कोणतेही ॲप सहजपणे वापरता येते.
advertisement
एखाद्या व्यक्तीचा चेहरा कसा आहे हे ओळखण्यासाठी आम्ही Look ॲप वापरतो. या ॲपच्या माध्यमातून आपल्याला ती व्यक्ती साधारणपणे कशी दिसते याचा अंदाज येतो, असे त्यांनी सांगितले. आम्ही तुमच्यासारखंच सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो फक्त आम्हाला तुमच्यात सामावून घ्या, असं आवाहन यावेळी रीना पाटील यांनी केलं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
World Sight Day : काहीच होत नाही म्हणून रडत बसणाऱ्यांनी नक्की पाहावं! अंध असून रिना पाटील आहे बँक कर्मचारी, परदेशातही गेल्या!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement