देवेंद्र फडणवीस यांनी एनडीटीव्ही मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना म्हटलं की, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीला बहुमत मिळेल. भाजप एकट्याच्या बळावर महाराष्ट्रात निवडणूक जिंकू शकत नाही पण सर्वाधिक मते आणि जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरेल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एनसीपीसोबत आम्ही महायुतीचं सरकार स्थापन करू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
advertisement
शिंदेंसोबत सुरत-गुवाहाटीला गेले; त्या 39 जणांना पुन्हा उमेदवारी, फक्त एकाचं तिकीट कापलं!
जागांच्या संख्येची भविष्यवाणी करणं मला आवडत नाही पण मी हे सांगेन की राज्यात महायुतीला बहुमत मिळेल. आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी सहज बहुमत मिळेल. अनेक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यानं मला वाईट वाटलं. पण निवडणूकपूर्व युतीत समन्वय साधावा लागतो. कोणी असं म्हणू शकत नाही की आम्हाला दुसऱ्या पक्षाची मतं हवी आहेत पण त्यांच्या उमेदवारांना एडजस्ट नाही करू शकत असंही फडणवीस म्हणाले.
भाजपने आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या असून यात 121 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. शिवसेना शिंदे गटाने आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेसुद्धा दोन याद्या जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडूनही बहुतांश उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
