ई-बसेसना टोलमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा
मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर 22 ऑगस्ट 2025 रोजी शासनाने अधिकृत परिपत्रक जारी केले आणि आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण–2025 अंतर्गत ही मागणी करण्यात आली होती. यासाठी 3 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवले होते. सरकारी, निमसरकारी आणि खासगी सर्व ई-वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेतला गेला होता, मात्र अधिकृत आदेश नसल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणी अडकली होती. भुजबळ यांनी तात्काळ परिपत्रक काढण्याची मागणी केली आणि शासनाने त्यावर सकारात्मक निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.
advertisement
यापूर्वी जर पाहिले तर सर्व ई-बसेसना जुन्या राष्ट्रीय महामार्गांचा पर्याय वापरावा लागायचा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय होत होता. पण आता टोलमाफी लागू झाल्यानंतर समृद्धी महामार्ग आणि इतर द्रुतगती मार्ग उपलब्ध झाल्याने मुंबई–नाशिक प्रवास साडेचार तासांवरून थेट साडेतीन तासांवर आला आहे.
'या' मार्गातील प्रवासांनाही होणार फायदा
या अंमलबजावणीचा थेट फायदा मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, मुंबई-शिर्डी आणि शिवडी-न्हावा-शेवा अटल सेतूवर धावणाऱ्या एसटीच्या सर्व ई-बसेसना होणार आहे. पुढील काळात मुंबई–छत्रपती संभाजीनगर, मुंबई-नागपूर, नाशिक-छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक-नागपूर या मार्गांवरही ई-बसेस सुरू झाल्यास त्यांनाही टोलमाफी मिळणार आहे.
