घरात कोणीच नव्हतं आणि घडला अनर्थ
मृत वृद्धाचे नाव शांताराम राणे (वय 81) असे असून ते पत्नी, मुलगा आणि सुनेसह त्या इमारतीत वास्तव्यास होते. घटनेच्या वेळी घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते आणि शांताराम राणे हे घरात एकटेच होते. ते त्यांच्या खोलीतील खिडकीजवळ उभे असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट 16व्या मजल्यावरून खाली कोसळले.
advertisement
खाली मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी गेले. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून हा अपघात आहे की अन्य कोणते कारण आहे याबाबत अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात कोणत्याही प्रकारचा संशयास्पद मुद्दा समोर आलेला नसला तरी पोलिस सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
