आईला रुग्णालयात ठेवून मुलाचा पळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित पुरी याने त्यांची 75 वर्षीय आई मोहिनी पुरी यांना ऑगस्ट महिन्यात तब्येत खराब झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते. पॅरलिसीसमुळे त्या अत्यंत अशक्त होत्या. सुरुवातीच्या दोन दिवसांत उपचारांना प्रतिसाद मिळाल्याने त्यांना आयसीयुतून जनरल वार्डमध्ये हलवण्यात आले. मात्र प्रकृती पुन्हा बिघडू लागली. श्वसनाचा त्रास, हृदयविकाराचे झटते आणि सर्वसाधारण आरोग्य खालावत असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर उपचार सुरू राहिले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न करून प्रकृती स्थिर केलीही.
advertisement
पोलिस, न्यायालय आणि रुग्णालय प्रशासन चक्रावले
परंतु रुग्णालयाने उपचारांच्या बिला बाबत विचारणा करताच अमित पुरी यांचा रोष प्रचंड वाढला. त्यांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांवर शिवीगाळ केली आणि उलट वकिलामार्फत नोटीसही पाठवली. अनेक दिवस उलटून गेले, परंतु मुलगा रुग्णालयात येऊन आईला घेऊन गेला नाही. प्रशासनाने वारंवार विनंती करूनही परिस्थितीत बदल झाला नाही. अखेर रुग्णालयाने पोलिसांकडे मदत मागितली.
पोलिसांची मध्यस्थीही केली पण त्याने काहीही न ऐकल्याने हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने आईला तात्काळ रुग्णालयातून नेण्याचे आदेश दिले, परंतु तेही अमितने धुडकावून लावले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने आणि आईला अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याने वांद्रे पोलिसांनी अमित पुरी यांच्यावर गुन्हा दाखल केला.
