TRENDING:

Elphinstone Bridge: आता होणार ट्रॅफिक जॅम! एल्फिस्टन पूल आजपासून बंद, पर्यायी मार्ग कोणते असतील

Last Updated:

Elphinstone Bridge: मुंबईतील ऐतिहासिक एल्फिस्टन पूल पाडकामासाठी आज रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आलीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईतील परळ आणि प्रभादेवी परिसरास जोडणारा ऐतिहासिक एल्फिस्टन पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी हा पूल शुक्रवार (25 एप्रिल) रोजी रात्री 9 वाजलेपासून वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. एल्फिस्टन सारखा महत्त्वाचा पूल बंद राहणार असल्याने वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आलीये. एल्फिस्टन पुलावरून पूर्व पश्चिम दिशांना जाणाऱ्या वाहनांना पर्यायी वाहतूक मार्गांची सोय करण्यात आलीये. तसेच काही मार्ग हे एकेरी (वन वे) करण्यात आले असून काही ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहे.
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल पाडकामासाठी आज रात्रीपासून बंद, असे असणार पर्यायी मार्ग
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल पाडकामासाठी आज रात्रीपासून बंद, असे असणार पर्यायी मार्ग
advertisement

असे असणार पर्यायी मार्ग

दादर पूर्वेकडून पश्चिमकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक ब्रीजचा वापर करता येईल. तर, परळ पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परळकडे जाणारी वाहने करी रोड ब्रीजचा वापर करतील.

परळ, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहने ही चिंचपोकळी ब्रीजचा वापर करतील.

प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय व के.ई.एम रुग्णालयकडे जाणाऱ्या वाहनांना दुपारी 3 ते रात्री 11 या काळात करी रोड ब्रीजचा वापर करता येईल.

advertisement

मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार, मे महिन्यात सुरू होणार नवा भुयारी मार्ग, पण कुठं?

करी रोड रेल्वे ब्रिजवरून..

कॉम्रेड कृष्णा देसाई चौककडून (भारत माता जंक्शन) शिंगटे मास्तर चौककडे वाहतूक ही सकाळी 7 ते दुपारी 3 या काळात एकेरी असणार आहे. तर शिंगटे मास्तर चौककडून कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडे (भारत माता जंक्शन) वाहतूक दुपारी 3 ते रात्री 11 या वेलेत एक मार्गी असणार आहे.

advertisement

इथे नो पार्किंग!

सेनापती बापट मार्ग : संत रोहिदास चौक (एलफिन्स्टन जंक्शन) ते रखांगी जंक्शन

ना. म. जोशी मार्ग : कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका) ते धनमिल नाका

भवानी शंकर मार्ग : हनुमान मंदिर, कबुतरखाना ते गोपीनाथ चव्हाण चौक

महादेव पालव मार्ग : कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) ते शिंगटे मास्तर चौक

advertisement

साने गुरुजी मार्ग : संत जगनाडे चौक ते कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका)

रावबहादूर एस. के. बोले मार्ग : हनुमान मंदिर ते पोर्तुगीज चर्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग

दोन रुग्णवाहिका तैनात

मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागमार्फत परेल व प्रभादेवी परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णालयात जाण्या व येण्यासाठी दोन रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. यातील एक रुग्णवाहिका प्रभादेवी रेल्वेस्थानक पश्चिम रेल्वे पादचारी पूल येथे, तर दुसरी रुग्णवाहिका परळ रेल्वेस्थानक पूर्व येथे उपलब्ध असणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

दरम्यान, मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून हा पूल तोडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. हा नवा पूल शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टरचा महत्त्वाचा भाग असणार आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Elphinstone Bridge: आता होणार ट्रॅफिक जॅम! एल्फिस्टन पूल आजपासून बंद, पर्यायी मार्ग कोणते असतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल