उत्तन- वसई- विरार सी लिंक या प्रोजेक्टमुळे वसई, विरार, डहाणू आणि पालघरमधील नागरिकांना पाऊण तासामध्ये म्हणजे फक्त 45 मिनिटांमध्येच मरीन ड्राईव्ह गाठता येणार आहे. दोन तासांचा प्रवास आता फक्त 45 मिनिटांवर येऊन पोहोचला आहे. अद्याप या कामाला सुरूवात झाली नसून लवकरच सुरूवात होणार आहे. पालघर ते मरीन ड्राईव्ह, दक्षिण मुंबईपर्यंतचा प्रवास सिग्नलमुक्त होणार आहे. सागरी पूलामुळे हा प्रवास खूपच सोयीस्कर होणार आहे. सागरी सेतुमुळे तब्बल दोन तासांचा हा प्रवास 45 मिनिटांवर येऊन पोहोचला आहे. या पुलाच्या कामाची जबाबदारी एमएमआरडीए कडून पूर्ण केले जाणार आहे.
advertisement
उत्तन- वसई- विरार सी लिंकमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील आणि पश्चिम रेल्वेवरील सुद्धा फार मोठा ताण कमी होणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे म्हणजेच एमएमआरडीएकडून पूर्ण होणार आहे. उत्तन- वसई- विरार सी लिंकसाठी पूर्वी 87 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आता हा खर्च 52,652 कोटीपर्यंत आणण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असली तरीही याचा खारफुटी आणि वनजमिनीवर परिणाम होणार आहे. या प्रकल्पासाठी विशेष उद्देश वाहन स्थापन करण्याच्या सूचना पर्यावरण विभागाने दिल्या आहेत.
विरार ते मरीन ड्राईव्ह हा सागरी पूल 55.12 किमी लांबीचा असणार आहे. मुख्य सागरी पूल हा 24.35 किमी लांब असणार आहे. हा पुल वर्सोवा, भाईंदर, दहिसर, कोस्टल रोडशी जोडला जाणार आहे. तर पुढे दिल्ली- मुंबई एक्सप्रेसवेशी जोडला जाणार आहे.
