महोत्सवात भेट देणाऱ्यांचे विशेष आकर्षण ठरते ते विविध वन-पुष्पांपासून तयार केलेला जॅम आणि हंगामी कंदमुळांवर आधारित पदार्थ. ग्रामीण भागातील नैसर्गिक चवीचा अनुभव देणाऱ्या या पदार्थांमध्ये ‘डुडान रुटु बाजी’ला मोठी मागणी दिसून आली. मक्याच्या भाकरीसोबत तीन प्रकारच्या खास रान-भाज्यांचा समावेश असलेला हा पदार्थ केवळ 100 रुपयांत उपलब्ध होता. याशिवाय ‘हिता-आथाणो’ गव्हाच्या पिठाचा पारंपरिक डोसा आणि विशेष चटणी तिही फक्त 50 रुपयांत मिळत आहे. मक्याच्या भातासोबत मसालेदार डाळ मिळणारे ‘डुडान गाठ दाल’ (50/-) आणि उकळलेल्या वन-कंदांना खास चटणीसह दिलेला ‘वाफला आबण्या कांद’ (50/-) हे पदार्थदेखील रसिकांनी चाखायला मिळणार आहे. गोड पदार्थांपैकी ‘मधुका टोस्ट’—वन-फुलांच्या जॅमसह लोण्याचे टोस्ट (30-)—आणि ‘डोमखा’ वन-फुलांपासून बनवलेला सुगंधी चहा (20/-) हे पदार्थ महोत्सवातील विशेष आकर्षण ठरले.
advertisement
खाद्यपदार्थांबरोबरच पावरा समाजाने लावलेल्या वनस्पतींच्या प्रदर्शनानेही पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. दैनंदिन आयुष्यात उपयुक्त असलेल्या औषधी वनस्पती दुर्मिळ रानफुले आणि अनेक वन-उत्पादने यांची माहिती देणारे स्टॉल विशेष लोकप्रिय होते. तसेच आदिवासी समुदायात पिढ्यानपिढ्या वापरली जाणारी पारंपरिक वाद्येही येथे प्रदर्शित करण्यात आली. या वाद्यांच्या तयार करण्याच्या पद्धतीपासून ते त्यांच्या सांस्कृतिक उपयोगापर्यंत सर्व माहिती उत्साहाने सांगितली जात होती.
शहराच्या धकाधकीतून दूर जाऊन निसर्गाच्या अस्सल चवीचा अनुभव देणारा हा महोत्सव दादरकरांसाठी एक अनोखे आकर्षण ठरला आहे