TRENDING:

Mumbai : अश्लील चाळे करणं पडलं महागात! तरुणी थेट समोरच गेली अन् रेल्वे प्लॅटफॉर्मवरच तरुणाला धूधू धुतला; पाहा VIDEO

Last Updated:

Mumbai Viral Video: मुंबई शहरातल्या गोवंडी रेल्वे स्थानकावर छेड काढणाऱ्या तरुणाला एका तरुणीने चांगलाच चोप दिलेला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गोवंडी रेल्वे स्थानकावर घडलेली धक्कादायक घटना पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. रोजच्या प्रवासात महिलांना छेडछाड, अश्लील हावभाव आणि विनयभंगाचे प्रसंग नव्या नाहीत, मात्र गोवंडीत घडलेली ही घटना अक्षरशः संतापजनक आहे. एका तरुणीने स्वतःचा आत्मसन्मान जपताना दाखवलेली धाडसपू्र्ण कृती आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
News18
News18
advertisement

नेमकं घडलं तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका बेंचवर ही तरुणी बसलेली होती.तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर बसलेला एक तरुण तिच्याकडे सतत एकटक नजर लावत होता. धक्कादायक तर म्हणजे काही मिनिटांनी त्याने अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. तरुणीने पहिल्यांदा तर या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं हे वागणं अधिक विचित्र आणि अधिक घाणेरडे होत गेले. शेवटी संताप अनावर झालेल्या तरुणीने धाडस दाखवले आणि थेट त्या तरुणाजवळ जाऊन त्याला जाब विचारला. ''का बघतोयस? हे काय हावभाव करत होतास?''मात्र त्यानंतर तरुणीला हे सहन न होताच तिने त्याच्या कानशिलात लगावली.

advertisement

https://www.instagram.com/p/DRgmoCODZA7/

तरुणीने दाखवलेलं धाडस पाहून सर्वजण थक्क

घडलेल्या या घटनेनंतर प्लॅटफॉर्मवरचे अनेक प्रवासी तिच्या मदतीला आले आणि त्यांनीही त्या तरुणाला चांगलाच चोप दिला. त्या वेळी कोणीतरी सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर काही तासांतच व्हायरल झाला. एवढंच नाही तर कमेंटबॉक्स नेटकऱ्यांनी तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले तर तरुणाच्या वागण्यावर प्रचंड संताप व्यक्त केला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

मुंबई लोकलमध्ये अशा छेडछाडीच्या घटना वाढल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलिसांकडून विविध मोहीम राबवण्यात येतात, मात्र तरीही काही विकृत प्रवासी नियमांकडे दुर्लक्ष करतात. गोवंडीतील ही घटना हा प्रकार किती गंभीर झाला आहे याचे जिवंत उदाहरण आहे. महिलांवर अशा विकृतांचा मानसिक त्रास वाढत चालला असून यावर कठोर पावले उचलण्याची मागणी आता सर्वत्र होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : अश्लील चाळे करणं पडलं महागात! तरुणी थेट समोरच गेली अन् रेल्वे प्लॅटफॉर्मवरच तरुणाला धूधू धुतला; पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल