TRENDING:

Mumbai News: दीड तासांचा प्रवास 20 मिनिटांत, गोरेगाव ते मुलुंड गेमचेंजर प्लॅन, कधी होणार?

Last Updated:

Mumbai News: या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होईल. तसेच दहिसर, मुलुंड आणि ठाणे दरम्यान प्रवासासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव–मुलुंड जोडरस्ता (GMLR) प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आता 2028 साल उजाडणार आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा प्रकल्प सध्या प्रगतिपथावर असला तरी पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोरेगाव ते मुलुंड हा प्रवास सध्या लागणाऱ्या सुमारे 90 मिनिटांवरून केवळ 20 मिनिटांवर येण्याची अपेक्षा आहे.
Mumbai News: दीड तासांचा प्रवास 20 मिनिटांत, गोरेगाव ते मुलुंड सुसाट, गेमचेंजर प्लॅन कधी होणार?
Mumbai News: दीड तासांचा प्रवास 20 मिनिटांत, गोरेगाव ते मुलुंड सुसाट, गेमचेंजर प्लॅन कधी होणार?
advertisement

सुमारे 12.20 किलोमीटर लांबीचा हा मार्ग पूर्व द्रुतगती मार्ग (मुलुंड) आणि पश्चिम द्रुतगती मार्ग (गोरेगाव) यांना थेट जोडणार आहे. प्रकल्प चार टप्प्यांत राबवण्यात येत असून त्यात उन्नत मार्ग, उड्डाणपूल आणि भूमिगत बोगद्यांचा समावेश आहे. विशेषतः तिसऱ्या टप्प्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे वसाहत परिसरातून जाणारा 13 मीटर व्यासाचा दुहेरी भूमिगत बोगदा उभारण्यात येत आहे. सध्या गोरेगाव–मुलुंड उड्डाणपुलाचे सुमारे 48 टक्के काम पूर्ण झाले असून बोगद्याचे काम 18 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

advertisement

डेडलाईन ठरली! ट्रॅफिक अन् लोकलच्या गर्दीचं नो टेन्शन, ठाणे ते मुंबई प्रवास सुसाट, लवकरच धावणार 'ही' मेट्रो

या प्रकल्पाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो प्रस्तावित वर्सोवा–दहिसर सागरी किनारा मार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होईल. तसेच दहिसर, मुलुंड आणि ठाणे दरम्यान प्रवासासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. या जोडमार्गाच्या कामासाठी जुलै 2029 ही मुदत निश्चित करण्यात आली असून 2026-27 च्या अर्थसंकल्पात सुमारे 2650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
धुंड संस्कार अन् हजारो वर्षांची परंपरा, कशी असते बंजारा समाजाची पारंपरिक होळी? V
सर्व पहा

दरम्यान प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम 31 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र कामात झालेल्या दिरंगाईमुळे संबंधित कंत्राटदारावर 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: दीड तासांचा प्रवास 20 मिनिटांत, गोरेगाव ते मुलुंड गेमचेंजर प्लॅन, कधी होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल