TRENDING:

Mumbai News: प्रजासत्ताक दिनाची परेड गाजवली, आता महाराष्ट्राचा चित्ररथ गिरगावात पाहता येणार

Last Updated:

दिल्लीच्या कर्तव्यपथावर सादर केलेला महाराष्ट्राचा चित्ररथ आता मुंबईकरांना पाहता येणार आहे. हा चित्ररथ आता गिरगावातल्या शोभायात्रेची शोभा वाढवणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: दिल्लीच्या कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील वेगवेगळ्या राज्यांनी पथसंचलनामध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा रथ होता. यंदा महाराष्ट्र राज्याचा ‘गणेशोत्सव- आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर चित्ररथ आधारित होता. या चित्ररथाने ट्रॉफी सुद्धा पटकावली आहे. दिल्लीमध्ये कौतुक झाल्यानंतर आता गिरगावातही हाच चित्ररथ सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. महाराष्ट्र राज्याची समृद्ध संस्कृती आणि परंपरा देश पातळीवर सादर करणाऱ्या या चित्ररथाने सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कारही पटकावला असून, हा महाराष्ट्रासाठी एक अभिमानाचा क्षण आहे.
News18
News18
advertisement

गुढी पाडवा सणासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. मुंबईतील गिरगावामध्ये, शोभायात्रेचे आयोजन केले जाते. अनेक वेगवेगळ्या संस्था या शोभायात्रेत सहभागी होत असतात. आता याच शोभायात्रेत दिल्लीतल्या पथसंचलनात सहभागी झालेले चित्ररथ सहभागी होणार आहेत. हा खरंतर महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. गणेशोत्सवाची धून फक्त महाराष्ट्रातच नाही तर परराज्यातही आणि परदेशातही पाहायला मिळते. भारतात राहत असलेले अनेक मराठी नागरिक परदेशात धुमधडाक्यात मराठी सण साजरी करत असतात. मुख्य बाब म्हणजे, महाराष्ट्राकडून सादर करण्यात आलेल्या चित्ररथाला 'सर्वोत्कृष्ट चित्ररथ' या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यामुळे ही सर्व महाराष्ट्रवासियांसाठी अभिमानाचीच बाब म्हणता येईल.

advertisement

दिल्लीतल्या पथसंचलनात सादर केलेला चित्ररथ आता गिरगावातही सादर केला जाणार आहे, ही माहिती @mumbai_ganesh_chaturthi या इन्स्टा पेजने मुंबईकरांना दिली आहे. सध्या त्यांनी शेअर केलेलीही इन्स्टा पेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांनी माहिती देताना इन्स्टाग्रामवर लिहिले की, “आपली संस्कृती, आपली मुळे आणि आपली ओळख देशासमोर घेऊन आलेला तो चित्ररथ… आता आपल्या खऱ्या हक्काच्या घरी परत आला आहे. हे केवळ एक प्रदर्शन नाही, तर महाराष्ट्राचा आत्मा, परंपरा आणि गौरवाचा उत्सव आहे!” दरवर्षी गुढी पाडवा सणानिमित्त मुंबईसह मुंबई उपनगरांतून अनेक तरूण- तरूणी गिरगावातल्या शोभायात्रेत सहभागी होत असतात. या मिरवणूकीत प्रत्येकाचा मराठमोळा पोशाख फार चर्चेचा विषय असतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
100 वर्षांपासून जपलाय परंपरेचा वारसा, पुण्यात टोपी खरेदीसाठी प्रसिद्ध ठिकाण, असते मोठी गर्दी
सर्व पहा

यावेळी ढोल पथके, चित्ररथ, लक्ष वेधणारा देखावा, बाईक रॅली आणि सामाजिक संदेश देणारे पोस्टर बॉईज- पोस्टर गर्ल सुद्धा इथे आवर्जुन असतात. ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकप्रकारे नवचैतन्य दिसते.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: प्रजासत्ताक दिनाची परेड गाजवली, आता महाराष्ट्राचा चित्ररथ गिरगावात पाहता येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल