एचएसआरपी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन बुकिंग कशी करावी?
1-बुकिंग सुरू करण्यासाठी पहिल्यांदा तर तुम्हाला गुगलवर 'Transport HSRP' असे सर्च करावे लागेल आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत HSRP पोर्टलवर जा. वेबसाइटवर गेल्यावर 'Select Office' वर क्लिक करा आणि तुमच्या वाहनाच्या MH- नंबरनुसार संबंधित RTO ऑफिस निवडा. त्यानंतर Order Now हा पर्याय निवडा.
2- नंबर प्लेट कुठे बसवायची हे निवडताना 'Dealer Premises' हा पर्याय निवडा. जर तुमचं वाहन जुनं असेल तर 'Complete HSRP kit for old vehicle' हा पर्याय निवडणे आवश्यक आहे.
advertisement
माहिती पडताळणी आणि अपॉइंटमेंट बुकिंग
3- यानंतर तुमचा पिनकोड, वाहन क्रमांक, चेसिस नंबर आणि इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक अचूक टाकावे लागतील. त्यानंतर मोबाईल नंबर नोंदवून 'Verify with Vaahan' वर क्लिक करा. तुमची माहिती पडताळणी झाल्यावर जवळचे फिटमेंट सेंटर (अधिकृत शोरूम/नियुक्त केंद्र) निवडा.
4-यानंतर तुम्हाला नंबर प्लेट बसवण्यासाठी तारीख आणि वेळ निवडावी लागते. सर्वसाधारणपणे 10 ते 15 दिवसांनंतरची अपॉइंटमेंट निवडणे योग्य असेल. अपॉइंटमेंटची सर्व योग्य ती माहिती भरुन झाल्यावर तुमचे बुकिंग पूर्ण होते आणि दिलेल्या दिवशी तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवू शकता.
