जर प्रवाशांकडे मासिक पास काढताना ओळखपत्र नसेल तर, त्यांना तिकिट मिळणार नाही. सादर केलेल्या ओळखपत्रावरील माहिती आणि सीझन तिकिटावरील माहितीशी सुसंगत असली पाहिजे. याव्यतिरिक्त, एसी लोकलमध्येही टिसींच्या माध्यमातून तिकिटांची तपासणी केली जाणार आहे, टिसी संपूर्ण लोकलची तिकिट तपासणी करणार आहेत, त्यामुळे विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि खोट्या तिकिटांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे कारवाईचा बडगा उचलणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सरकारी रेल्वे पोलिसांना (जीआरपी) आरोपींविरोधात ठोस कारवाई करण्यासाठी बनावटगिरीचे खटले जलदगतीने दाखल करण्याची विनंती केली आहे.
advertisement
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने संयुक्तपणे शुक्रवारपासून (12 डिसेंबर) कठोर अंमलबजावणी उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांनी व्यवस्थित तिकिट काढूनच प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे करीत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेमध्ये तिकीट तपासणीचे काम जलद गतीने केले जाणार आहे. बनावट तिकिटांवर आणि विना तिकिटावर प्रवास करणार्यांना शोधण्यासाठी आणि त्यांना आळा घालण्यासाठी रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेमध्ये तपासणी करण्यासाठी विशेष तिकीट तपासणी पथके तैनात केली जाणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी बनावट तिकिटांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवासांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, ज्यामध्ये 318(2), 336(3), 336(4), 340(1), 340(2), आणि 3/5 यांचा समावेश आहे, जे फसवणूक, बनावटगिरी आणि संबंधित गुन्ह्यांशी संबंधित आहेत. शिक्षेमध्ये दंड आणि 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही समाविष्ट आहेत.
