TRENDING:

SBI Bharti 2026: एसबीआय बँकेत 2273 जागांसाठी भरती, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महाराष्ट्रात किती रिक्त जागा?

Last Updated:

स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये जर तुम्ही नोकरी करण्याच्या विचारात असाल, तरही बातमी तुमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये (State Bank Of India) जर तुम्ही नोकरी करण्याच्या विचारात असाल, तरही बातमी तुमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. एसबीआयमध्ये 2273 रिक्त जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. सर्कल बेस ऑफिसर्स (Circle Based Officers- CBO) या पदासाठी भरती केली जाणार आहे. 2050 रेग्युलर रिक्त पदे असणार आहेत तर 223 बॅकलॉग पदे असणार आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. नुकतीच ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 असणार आहे. नेमकी शैक्षणिक पात्रता किती? सर्कल बेस ऑफिसर्स पदासाठी नक्की काय काय शैक्षणिक पात्रता लागणार? जाणून घेऊया...
SBI Bharti 2026: एसबीआय बँकेत 2273 जागांसाठी भरती, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महाराष्ट्रात किती रिक्त जागा?
SBI Bharti 2026: एसबीआय बँकेत 2273 जागांसाठी भरती, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महाराष्ट्रात किती रिक्त जागा?
advertisement

सर्कल बेस ऑफिसर्स (Circle Based Officers- CBO) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्याची शेवटची तारीख एक सारखीच आहे. जेव्हा उमेदवार ऑनलाईन अर्ज भरतील तेव्हाच त्यांना अर्ज शुल्क सुद्धा भरायचे आहे. दोन्हीही एकत्र भरल्यानंतरच तुमचा अर्ज संपूर्ण अर्ज भरला जाईल. कोणत्याही शाखेतली पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे किंवा कोणत्याही बँकेमध्ये दोन वर्षांचा अनुभव अनिवार्य असणार आहे, अशी शैक्षणिक पात्रता असणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही शाखेतली पदवी असाल तरी तुम्ही अर्ज करु शकणार आहेत.

advertisement

अर्ज प्रक्रिया करण्यासाठी उमेदवार 31 डिसेंबर 2025 या तारखेपर्यंत 21 ते 30 वर्षामध्येच असावा. तर, SC- ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. संपूर्ण भारतामध्ये नोकरीचं ठिकाण असणार आहे. खुला प्रवर्ग, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 750 रूपये अर्ज शुल्क आहे, तर SC, ST आणि PWD उमेदवारांना अर्ज शुल्क माफ करण्यात आला आहे. त्यांना अर्ज भरताना कोणतीही फी भरायची नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 194 जागांवर भरती केली जाणार आहे आणि मुंबईसह उपनगरांमध्ये 143 जागांवर भरती होणार आहे. जाहीरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2026 मध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे. अर्जदारांना बातमीमध्ये, जाहिरातीची लिंक आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची लिंक देण्यात आली आहे. अर्ज भरण्याआधी एकदा व्यवस्थित जाहीरात वाचूनच अर्ज भरायचा आहे.

advertisement

Recruitment of Circle Based Officers 2026 Notification

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा दर तेजीत, आले आणि डाळिंबाला कसा मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

Recruitment of Circle Based Officers 2026 Online Form Link

मराठी बातम्या/मुंबई/
SBI Bharti 2026: एसबीआय बँकेत 2273 जागांसाठी भरती, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महाराष्ट्रात किती रिक्त जागा?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल