पूँछमध्ये विराजमान होणारी ही सहा फुटाची गणेशमूर्ती कुर्ला येथील दिव्यांग मुर्तीकार विक्रात पांढरे यांच्या गणेश चित्र शाळेत घडवली आहे. देशाचं संरक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना गणेशोत्सव साजरा करता यावा म्हणून मानवाधिकार कार्यकर्त्या किरण बाला इशर (ईशरदीदी) आणि शिवनेर सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक छत्रपती आवटे यांच्या पुढाकारानं हा गणेशोत्सव करण्यात येतो.
अयोध्येतील राम मंदिराची पुणेकरांना पर्वणी, पाहा दगडूशेठच्या देखाव्याचा फर्स्ट लुक
advertisement
गेल्या 14 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. अगदी कोरोना काळातही भारत-पाक सीमेवर हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. मुंबई ते जम्मू रेल्वेनं आणि जम्मू रेल्वे स्टेशनपासून पुढे 300 किलोमीटर दूर दूर्गम भागात ट्रकनं पूंछ गावात बाप्पा नेण्यात येतो, अशी माहिती ईशरदीदी यांनी दिली.
गणेशोत्सवात बाप्पाला काय नैवेद्य दाखवावा? जाणून घ्या शास्त्र
भारत- पाक सीमेवर पुंछ सीमारेषा ही भारतातील पीरपंजाल या पर्वत श्रृंखलेतील भाग आहे. या पर्वतीय भागात जंगली जनावरांनी भरलेल्या घनदाट जंगलात,. आपले सैनिक या सर्व नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन देशाचं संरक्षण करतात. या परिस्थीतीही दरवर्षी प्रमाणे गणेश उत्सव साजरा करणार असा विश्वास सैनिकांना आहे, “सैनिकांच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास ईशरदीदींनी व्यक्त केला.