कर्जत–पनवेल या महत्त्वाच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. संपूर्ण प्रकल्पाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले असून उरलेले काम पुढील काही महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या मार्गावरून मार्च 2026 पासून लोकल सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मध्य रेल्वेवर 11 दिवस खोळंबा! डेक्कन, कोयनासह 15 मेल-एक्स्प्रेस उशिरा धावणार, पाहा वेळापत्रक
advertisement
मुख्य प्रकल्प प्रगती
1) 29.6 किमी लांबीचा प्रकल्प जानेवारी 2021 मध्ये सुरू झाला होता.
2) कोरोना काळात अडथळे आले, पण नंतर कामाला वेग आला.
3) लोहमार्ग, तीन मोठे बोगदे, 44 पूल, 15 भुयारी मार्गिका यापैकी बहुतांश काम पूर्ण.
4) उर्वरित 20% काम पूर्ण करण्यासाठी एमआरव्हीसीने दोन महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे.
सीआरएस चाचण्या फेब्रुवारीत
मार्गाचा तांत्रिक दर्जा तपासण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये सीआरएस चाचण्या घेण्यात येणार आहेत. चाचण्यांमध्ये प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेची चाचणी, सुरक्षा पडताळणी आदी प्रक्रिया होतील. प्रमाणपत्र मिळताच मार्गावर नियमित वाहतूक सुरू करण्यात येईल. या मार्गावर पनवेल, मोहोपे, चिखले, चौक आणि कर्जत अशी 5 स्थानके आहेत. सर्व स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात प्लॅटफॉर्म, सिग्नलिंग आणि सुविधा उभारणी जवळपास पूर्ण झाली आहे.
प्रवाशांना मोठा फायदा
कर्जत ते सीएसएमटी प्रवास सध्या
जलद लोकल : सुमारे 2 तास
धीमी लोकल : 2.5 तास
नव्या दुहेरी मार्गावरून वाया पनवेल प्रवास केल्यास 30 मिनिटांचा प्रवास वेळ वाचणार आहे.
या मार्गावर सध्या जड प्रमाणात मालगाड्या चालतात, त्यामुळे प्रवासी गाड्यांना विलंब होतो. दुहेरीकरणामुळे प्रवासी लोकलची संख्याही वाढणार आहे.
लोकल सेवेचा प्रवाशांना दिलासा
कर्जत–पनवेल दुहेरी मार्ग पूर्णत्वास आल्यानंतर उपनगरी लोकल सेवेला मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गावर मालगाड्यांची संख्या जास्त असल्याने प्रवासी गाड्यांना अडथळे व विलंब सहन करावा लागतो. मात्र दुहेरीकरणामुळे प्रवासी व मालवाहतूक या दोन्ही गाड्या स्वतंत्र मार्गावरून धावतील, ज्यामुळे संपूर्ण वाहतूकव्यवस्था अधिक सुरळीत होणार आहे. याशिवाय कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या प्रवासाचा कालावधी वाया पनवेलमार्गे साधारण ३० मिनिटांनी कमी होणार असून प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक जलद, आरामदायक आणि वेळेवर होणार आहे.
2,782 कोटींचा महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प
मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधांसाठी हा 2,782 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यात 29.6 किलोमीटरचा दुहेरी लोहमार्ग, पूल, भुयारी मार्गिका, उड्डाणपूल तसेच आधुनिक सिग्नल आणि सुरक्षा सुविधा यांचा समावेश आहे. उड्डाणपुलावर गर्डर टाकण्याचे कामही पूर्ण झाले असून संपूर्ण मार्ग तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने सर्व कामे जलदगतीने पुढे सरकत आहेत. या मार्गामुळे मुंबई–पुणे–कोकण या सर्वच दिशांना रेल्वे वाहतूक अधिक गतीमान आणि मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपनगरी नेटवर्कमधील सर्वात लांब बोगदा
या प्रकल्पात सर्वाधिक लक्षवेधी ठरणारी बाब म्हणजे कर्जत–पनवेल मार्गावर तयार करण्यात आलेला वावर्ले बोगदा. 2265 मीटर लांबीचा हा बोगदा मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कमधील सर्वात लांब बोगदा ठरला असून याआधी सर्वाधिक लांब मानला जाणारा ठाणे–दिवा दरम्यानचा 1,300 मीटरचा पारसिक बोगदा मागे पडला आहे. त्याचबरोबर या मार्गावरचे नढाल (299 मीटर) आणि किरवली (300 मीटर) बोगदेही प्रकल्पाच्या एकूण सुरक्षितता आणि तांत्रिक मजबुतीत भर घालतात. या तीनही बोगद्यांचा समावेश कर्जत–पनवेल दुहेरी मार्गाला अधिक सुरक्षित, भूकंपीयदृष्ट्या सक्षम आणि वेगवान बनवतो.






