मध्य रेल्वेवर 11 दिवस खोळंबा! डेक्कन, कोयनासह 15 मेल-एक्स्प्रेस उशिरा धावणार, पाहा वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Central Railway: मध्य रेल्वेने 11 दिवसांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे कोयना, डेक्कनसह एक्स्प्रेस गाड्या उशिरा धावणार आहेत.
मुंबई: लोणावळा रेल्वे स्थानकातील यार्डचे आधुनिकीकरण व मार्गिकांच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून 11 दिवसांचा विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. बुधवार, 26 नोव्हेंबरपासून 6 डिसेंबरपर्यंत लागू असलेला हा ब्लॉक डाउन मार्गावरील महत्त्वाच्या सिग्नल व रुळांवरील कामांसाठी अत्यावश्यक असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. दररोज सकाळी 11.25 ते सायंकाळी 6.26 या वेळेत रुळांशी संबंधित विविध तांत्रिक कामे केली जाणार असल्याने लोणावळा, कर्जत आणि भिवपुरी रोड स्टेशनांदरम्यान गाड्यांची नियमित ये-जा बाधित होणार आहे.
या ब्लॉकदरम्यान लोणावळा यार्डातील डाउन यार्डमध्ये तीन तर अप यार्डमध्ये पाच मार्गिकांचा विस्तार तसेच अतिरिक्त मार्गिकांवरील सिग्नल प्रणालीचे ‘प्री-नॉन इंटरलॉकिंग’ व ‘नॉन-इंटरलॉकिंग’ काम होणार असल्याने अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या नियंत्रित गतीने धावतील. परिणामी डेक्कन एक्स्प्रेससह 15 गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
advertisement
28 आणि 29 नोव्हेंबर रोजी विलंबाचा परिणाम
या दोन दिवसांत खालील मेल-एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावणार आहेत:
पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस (11008): 1 तास 15 मिनिटे
पुणे-सीएसएमटी इंटरसिटी (12128): 15 मिनिटे
पुणे-सीएसएमटी इंद्रायणी (22106): 15 मिनिटे
दौंड-इंदौर (22943): 1 तास
कोल्हापूर-सीएसएमटी कोयना (11030): 40 मिनिटे
बंगळुरू-सीएसएमटी उद्यान (11302): 30 मिनिटे
नागरकोइल-सीएसएमटी (16352): 1 तास 30 मिनिटे (केवळ 28 नोव्हेंबर)
advertisement
सीएसएमटी-चेन्नई (22159): 10 मिनिटे
मदुराई-एलटीटी (22102): 15 मिनिटे (केवळ 29 नोव्हेंबर)
26 व 27 नोव्हेंबर रोजी खालील गाड्या उशिराने धावणार:
जोधपूर-हडपसर (20945): 45 मिनिटे
सीएसएमटी-चेन्नई (22159): 1 तास
एलटीटी-मदुराई (22101): 10 मिनिटे
सीएसएमटी-भुवनेश्वर कोणार्क (11019): 15 मिनिटे
सीएसएमटी-हैदराबाद (22732): 15 मिनिटे
एलटीटी-काकीनाडा (17222): 10 मिनिटे
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी नियोजन करण्याचे आणि दिलेल्या वेळेत स्टेशनवर वेळेपूर्वी पोहोचण्याचे आवाहन केले आहे. या कामांमुळे भविष्यात गाड्यांची क्षमता वाढून वाहतूक अधिक सुरळीत होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 8:35 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मध्य रेल्वेवर 11 दिवस खोळंबा! डेक्कन, कोयनासह 15 मेल-एक्स्प्रेस उशिरा धावणार, पाहा वेळापत्रक


