Pune News: अव्वाच्या सव्वा भाड्याला 'राम राम'! पुणे स्टेशन-वाघोली मार्गावर 'रातराणी' ठरली वरदान

Last Updated:

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMP) सुरू केलेली पुणे स्टेशन ते वाघोली दरम्यानची 'रातराणी' बससेवा अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे.

पुणे स्टेशन-वाघोली मार्गावर 'रातराणी'
पुणे स्टेशन-वाघोली मार्गावर 'रातराणी'
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMP) सुरू केलेली पुणे स्टेशन ते वाघोली दरम्यानची 'रातराणी' बससेवा अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या या सेवेमुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांची मोठी सोय झाली आहे. तसंच याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रातराणीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता नागरिकांकडून शहरातील अन्य महत्त्वाच्या मार्गांवरही ही सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी पुणे शहरात राज्यभरातून तसंच अगदी राज्याबाहेरील लाखो लोक वास्तव्यास आहेत. यामुळे विमान, रेल्वे किंवा खासगी वाहतुकीने रात्री उशिरा शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. रात्रीच्या वेळी अनेकदा रिक्षाचालक प्रवाशांची गरज पाहून जास्त पैसे उकळत होते. तसंच महिला आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला होता.
advertisement
या पार्श्वभूमीवर, पीएमपीने अगोदरच सहा महत्त्वाच्या मार्गांवर 'रातराणी' बससेवा सुरू केली होती आणि तिला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर आता नागरिकांकडून सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने नुकतीच पुणे स्टेशन ते वाघोली मार्गावरही ही सेवा सुरू केली. ज्यामुळे या भागातील प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
पीएमटीची रातराणी सेवा सध्या खालील मार्गांवर उपलब्ध आहे:
कात्रज ते शिवाजीनगर बसस्थानक
advertisement
कात्रज ते पुणे स्टेशन
हडपसर ते स्वारगेट
हडपसर ते पुणे स्टेशन
निगडी ते पुणे स्टेशन (वाकडेवाडी मार्गे)
पुणे स्टेशन ते एनडीए गेट 10
पुणे स्टेशन ते निगडी
आणि आता पुणे स्टेशन ते वाघोली
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: अव्वाच्या सव्वा भाड्याला 'राम राम'! पुणे स्टेशन-वाघोली मार्गावर 'रातराणी' ठरली वरदान
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement