मुंबई सीएसएमटी–करमाळी दैनिक विशेष
कोकणात आणि गोव्यात जाणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई सीएसएमटी-करमाळी ही विशेष गाडी 19 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत दररोज चालवण्यात येणार आहे.
गाडी क्र. 01151 – मुंबई सीएसएमटी–करमाळी (दैनिक)
कालावधी : 19 डिसेंबर ते 5 जानेवारी रोजी दररोज
सुटण्याची वेळ : रात्री 12.20
सुटण्याचे ठिकाण : मुंबई सीएसएमटी
advertisement
गंतव्य : करमाळी (गोवा)
गाडी क्र. 01152 – करमाळी–मुंबई मुंबई सीएसएमटी (दैनिक)
कालावधी : 19 डिसेंबर ते 5 जानेवारी रोजी दररोज
सुटण्याची वेळ : दुपारी 2.15
सुटण्याचे ठिकाण : Karmali
गंतव्य : मुंबई सीएसएमटी
या दोन्ही गाड्यांचे आरक्षण PRS केंद्रांवर, इंटरनेटद्वारे आणि IRCTC वेबसाइटवर उपलब्ध असून, सुट्टीची गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांनी लवकर तिकीट आरक्षित करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
एलटीटी–तिरुवनंतपुरम उत्तर साप्ताहिक विशेष
दक्षिण भारतात विशेषतः केरळमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून तिरुवनंतपुरम उत्तर दिशेने साप्ताहिक विशेष गाडीही सोडण्यात येणार आहे.
गाडी क्र. 01171 – एलटीटी–तिरुवनंतपुरम उत्तर (गुरुवार)
सुटण्याच्या तारखा :
18 डिसेंबर
25 डिसेंबर
1 जानेवारी
8 जानेवारी
सुटण्याची वेळ : दुपारी 4.00
सुटण्याचे स्थान : एलटीटी, मुंबई
गाडी क्र. 01172 – तिरुवनंतपुरम उत्तर–एलटीटी (शनिवार)
परतीच्या तारखा :
20 डिसेंबर
27 डिसेंबर
3 जानेवारी
10 जानेवारी
सुटण्याची वेळ : दुपारी 4.20
सुटण्याचे स्थान : तिरुवनंतपुरम उत्तर
ही गाडी तिरुवनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम यांसारख्या प्रमुख स्थानकांना जोडत असल्याने दक्षिणेकडील प्रवाशांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.
एलटीटी-मंगळुरू जंक्शन साप्ताहिक विशेष
नाताळ ते नववर्ष या काळात कोकण–कर्नाटक किनारपट्टीकडे होणारी मोठी गर्दी पाहता एलटीटी-मंगळुरू जंक्शन मार्गावरही विशेष साप्ताहिक गाडी चालवण्यात येणार आहे.
आरक्षण सुरू, प्रवाशांना आवाहन
सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण आता सुरू झाले असून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी आरक्षण तातडीने करून घ्यावे, असे सांगितले आहे. नाताळ आणि नववर्षाच्या काळात कोकण रेल्वेवर प्रवाशांची पारंपरिक गर्दी मोठी असते. त्यामुळे या अतिरिक्त गाड्यांमुळे तिकीट टंचाई कमी होईल आणि प्रवास अधिक सुरळीत होईल, असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.






