ऐन हिवाळ्यातच मुंबईत पाणीबाणी! 3 दिवसांसाठी पाणी कपात, केव्हा आणि कुठे राहणार बंद; जाणून घ्या
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या वेगवेगळ्या विभागांमधील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मुंबईकरांना आता पुन्हा एकदा येत्या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांना आता पुन्हा एकदा येत्या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या वेगवेगळ्या विभागांमधील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. अशातच येत्या 12, 13 आणि 14 डिसेंबर अशा तीन दिवसांमध्ये बीएमसीने काही भागांमध्ये, पाईपलाईन जोडणीचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. नेमक्या कोणकोणत्या विभागांमध्ये बीएमसीने पाणी पुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे, जाणून घेऊया...
बीएमसीच्या काही क्षेत्रात, पाणी पुरवठा 12, 13 आणि 14 डिसेंबर असे तीन दिवस बंद राहणार आहे. तीनही दिवस 24 तासांसाठी पाईपलाईन जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून शुक्रवार 12 डिसेंबरपासून पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. जो 13 डिसेंबरच्या सकाळी 9 वाजल्यापर्यंत बंद राहणार आहे. जी/ उत्तर वॉर्ड, के/ पूर्व वॉर्ड आणि एच/ पूर्व वॉर्ड अशा तीन विभागांमध्ये दोन दिवसांत काम पूर्ण केले जाणार आहे. दोन दिवस वेगवेगळ्या विभागांमध्ये काम हाती घेतले जाणार आहे. तीनही विभागांमध्ये परिसराच्या वापराप्रमाणे जलवाहिनी बसवण्यात येणार आहे.
advertisement
बीएमसीच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे काही दिवस पाणी बंद ठेवणे आवश्यक आहे. कारण दीर्घकालीन पुरवठा आणि सिस्टमची विश्वासार्हता सुधारण्यासाठी महापालिका पाणीपुरवठा लाइन जोडणार आहे. काही भागात, विशेषतः के-पूर्व वॉर्डमध्ये या काळात कमी दाबाचा पाणीपुरवठा होऊ शकतो. या कामात अनेक मुख्य पाईपलाईन जोडल्या जातील. यामध्ये 1800 मिमी तानसा पश्चिम जलवाहिनी, 1200 मिमी जलवाहिनी, 2400 मिमी वैतरणा जलवाहिनी आणि जी/उत्तर वॉर्डमधील 1500 मिमी जलवाहिनीचा समावेश आहे. भविष्यातील सुरळीत पाणी पुरवठा निश्चित करण्यासाठी बंद करणे आवश्यक असल्याचे बीएमसीकडून निवेदनात म्हटले आहे.
advertisement
या कालावधीत शहरातील कोणत्या भागांमध्ये परिणाम होईल याची यादीही बीएमसीने शेअर केली आहे.
- जी/उत्तर वॉर्ड
12 डिसेंबर- धारावी लूप रोड, एकेजी नगर, धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, दिलीप कदम रोड, जास्मिन मिल रोड , माहीम फाटक
13 डिसेंबर- जास्मिन मिल रोड, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास रोड, ६० फूट रोड, ९० फूट रोड, संत कक्किया रोड, एमपी नगर, महात्मा गांधी रोड.
advertisement
12 डिसेंबर- मरोळ, मिलिटरी रोड, वसंत ओएसिस, गावदेवी, गुंदवली, चकाला, बामनवाडा, माहेश्वरी नगर, भवानी नगर, कोंडीविटा, एअरपोर्ट रोड परिसर, जेबी नगर, बगरका रोड आणि आजूबाजूचा परिसर
कोळडोंगरी, जुनी पोलिस गल्ली, विजय नगर (सहर रोड) आणि मोगरपाडा या परिसरात 12 डिसेंबरला पाण्याचा कमी दाबाचा पट्टा असेल.
13 डिसेंबर- ओम नगर, कांती नगर, राजस्थान नगर, सहार गाव, सुतार पाखाडी
advertisement
12 डिसेंबर- संपूर्ण वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसर आणि मोतीलाल नगर
13 डिसेंबर- प्रभात कॉलनी, सीएसटी रोड (दक्षिण बाजू), यशवंत नगर, सुंदर नगर, गोळीबार रोड ते खेरवाडी, बेहराम नगर, सरकारी कॉलनी, वांद्रे (पूर्व)
बीएमसीने रहिवाशांना पुरेसा पाणी साठवण्याचा, दुरुस्तीच्या काळात पाणी काळजीपूर्वक वापरण्याचा आणि खबरदारी म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून फिल्टर करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नागरिकांना देखभालीच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 10, 2025 8:03 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ऐन हिवाळ्यातच मुंबईत पाणीबाणी! 3 दिवसांसाठी पाणी कपात, केव्हा आणि कुठे राहणार बंद; जाणून घ्या








