दरम्यान, प्रवाशांचा प्रवास सोपा आणि सुखकर व्हावा, यासाठी कोकण रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या काळात मुंबई- कोकण- गोवा मार्गावर दोन मेमू स्पेशल ट्रेन सोडल्या जाणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या दिवसांचा विचार करून कोकण रेल्वेने या कालावधीत प्रवाशांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.
घरातील झाडू कधी फेकावा, कधी खरेदी करावा? हे 5 नियम पाळा, व्हाल श्रीमंत!
advertisement
हॉलिडे स्पेशल ट्रेन नं 01004 अप मडगाव जं. – लोकमान्य टिळक टर्मिनस ही ट्रेन 5, 12 आणि 19 ऑक्टोबर या दिवसांमध्ये धावणार आहे. मडगाव जं. वरून संध्याकाळी 04:30 वाजता सुटणारी ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसवर दुसऱ्या दिवशी सकाळी 06:20 वाजता पोहोचेल. ही ट्रेन, करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अदवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी थांबे घेणार आहे.
तर 01003 डाऊन मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव जं. ही ट्रेन 6, 13 आणि 20 ऑक्टोबर दरम्यान धावणार आहे. सकाळी 08:20 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ही रेल्वे सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10:40 वाजता ही ट्रेन मडगाव जं.वर पोहोचेल. या एक्सप्रेसला 2 टायर एसीचा 1 डब्बा, 3 टायर एसीचे 3 डब्बे, 3 टायर एसी इकोनॉमीचे 2 डब्बे, स्लीपर कोचचे 8 डब्बे, जनरलचे 4 डब्बे, जनरेटर कारचा 1 डब्बा आणि एसएलआरचा 1 डब्बा अशा एकूण 20 डब्ब्यांची रचना ट्रेनला आहे. गाडी क्र. 01004 आणि 01003 साठीची बुकिंग 1 ऑक्टोबर 2025 पासून सर्व पीआरएस (PRS) काउंटर्स, इंटरनेट आणि IRCTC च्या वेबसाइटवर सुरू झाली आहे.
इतिहासात प्रथमच! कोल्हापुरात तृतीयपंथी संघटना चालवणार रेशन दुकान
आणखी एक हॉलिडे स्पेशल सुरू करण्यात आली आहे. ट्रेन नं 01160 अप चिपळूण – पनवेल ही ट्रेन 3 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या काळामध्ये प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिन्ही दिवशी धावणार आहे. चिपळूण रेल्वे स्थानकावरून ही ट्रेन सकाळी 11:05 मिनिटांनी सुटेल. त्याच दिवशी पनवेल स्थानकावर ही ट्रेन संध्याकाळी 04:10 वाजता पोहोचेल. ही ट्रेन, अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवंखवती, विन्हेरे, करंजडी, सपे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठाणे, कसू, पेण, जिते, आपटा, सोमठाणे आणि पनवेल या स्थानकांवर ही ट्रेन थांबा घेणार आहे.
तर 01159 डाऊन मार्गावर पनवेल – चिपळूण ही ट्रेन 3 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या काळामध्ये प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिन्ही दिवशी धावणार आहे. संध्याकाळी 04:40 वाजता ही ट्रेन पनवेल स्थानकावरून सुटणार असून चिपळूण स्थानकावर ही ट्रेन रात्री 09:55 वाजता पोहोचणार आहे. या ट्रेनला मेमू ट्रेनचे एकूण 8 डब्बे असणार आहेत. दिवाळीच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांनी या गाड्यांचा तपशील पाहून आपल्या प्रवासाचे वेळेत तिकीट बुकिंग करावे.