'ही' आहेत नो पार्किंग क्षेत्र
आपत्कालीन सेवा आणि पोलिस वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांना खालील रस्त्यांवर उभे करण्यास मनाई करण्यात आली आहे , ज्यात जुहू तारा रोड, ए. बी. नायर रोड तसेच जुहू चर्च रोड आणि बिलो लेन (व्ही. एम. रोड) या रस्त्यांवर दोन्ही बाजूंना पार्किंग बंद राहील.
'या' मार्गावर असेल प्रवेश बंदी
advertisement
जुहू तारा रोड हा सांताक्रूझ पोलिस ठाणे चौक ते जुहू चौपाटी तसेच ट्यूलिप स्टार हॉटेल चौक ते जुहू चौपाटी या दरम्यान आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. या रस्त्यांवर फक्त छठपूजेतील वाहनेच जाऊ शकतील अशी माहिती समोर आलेली आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
लिंक रोडकडून जुहू तारा रोडकडे येणाऱ्या वाहनांनी सांताक्रूझ पोलिस ठाणे चौक येथे उजवीकडे वळावे त्यानंतक स्टँडर्ड चार्टर्ड बँक चौक येथे डावीकडे वळून एस. व्ही. रोडमार्गे प्रवास करावा. ट्यूलिप स्टार हॉटेल चौकाकडून येणाऱ्या वाहनांना व्ही. एम. रोडमार्गे वळविण्यात येईल.
अशी असेल एकमार्गी वाहतूक
ए. बी. नायर रोड हा चर्च रोड ते बलराज साहनी मार्ग या दिशेने एकमार्गी ठेवण्यात येणार आहे.
अतिरिक्त पर्यायी मार्ग कोणते?
वाहनचालकांनी एन. एस. रोड क्र. 13, जुहू चर्च रोड किंवा अल्फ्रेडो क्रिओडो रोड या मार्गांचा वापर करून प्रवास करावा अशी सूचना देण्यात आली आहे.
यू-टर्न बंदी असेल 'या' मार्गांवर
हॉटेल महाराजा भोगसमोरील यू-टर्न हा दक्षिणेकडून ट्यूलिप स्टार हॉटेलमार्गे जुहू कोळीवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बंद राहील. वाहनचालकांनी कोळीवाडा चौकातील यू-टर्नचा वापर करावा.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक वाहन वापर टाळावा तसेच वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करावा. या उपाययोजनांमुळे छठपूजेच्या दिवशी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होईल.
