मुंब्रा येथे घडलेल्या अपघातानंतर स्वयंचलित नॉन-एसी लोकल प्रकल्पाला अधिक गती मिळाली आहे. रेट्रोफिटिंग तंत्रज्ञानाद्वारे विद्यमान गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जातील तसेच नवीन नॉन-एसी गाड्यांमध्ये बंद दरवाजांचा डिझाइन वापर केला जाईल. एसी लोकलमध्येही भविष्यात नैसर्गिकरीत्या बंद दरवाजे असतील. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार गर्दीच्या वेळेस एक लोकलमध्ये सुमारे 4 हजार प्रवासी प्रवास करू शकतात. जे आताच्या अडीच ते तीन हजार प्रवाशांच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत स्वयंचलित बंद दरवाजे अपघात रोखण्यास मदत करतील.
advertisement
मुंबईतील लोकल गाड्या सध्या मुख्यतहा 12 डब्यांच्या आहेत. परंतु काही गाड्या 15 डब्यांच्या आहेत. नवीन निविदेत 17 डब्यांच्या गाड्यांचा समावेश आहे आणि भविष्यात 18 डब्यांच्या गाड्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
वंदे मेट्रो कोचचा चेहरामोहरा बदलणार
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने अलीकडेच 2,856 वंदे मेट्रो कोच खरेदीसाठी ई-निविदा जारी केली आहे. या कोचची देखभाल दीर्घकालीन कराराखाली होईल. नवीन कोचमध्ये मेट्रोसारखी वैशिष्ट्ये असतील. जसे की स्वयंचलित बंद दरवाजे, सुधारित वायुविजन, आरामदायी आसन व्यवस्था तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले,आमचे प्राथमिक उद्दिष्ट प्रवाशांची सुरक्षा आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईतील सर्व लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे असतील. हे बदल प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास सुनिश्चित करतील. या नव्या उपक्रमामुळे मुंबईतील लोकल प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज होईल तसेच अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची सुरक्षितता, गर्दी कमी करणे आणि प्रवासाचा अनुभव सुधारण्यावर या उपक्रमाचा मुख्य भर आहे.