सांगली
सांगली शहरातल्या अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांच्या तोबा गर्दी उडाल्याचे पहायला मिळत आहे. अनेक पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने वाहतुकीचा एक खोळंबा निर्माण झाला आहे.नवीन मोटर वाहन कायद्यानुसार एखाद्या चालकाकडून अपघात झाल्यास दहा वर्षांची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र, या कायद्याला वाहनधारक संघटनेकडून विरोध होताना पाहायला मिळत आहे.
advertisement
वर्धा
वर्ध्यात पेट्रोल पंपावर वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उद्यापासून पेट्रोल पंप बंद असल्याच्या अफवेने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर लावल्या रांगा लावल्या आहेत. ग्रामीण भागातही पेट्रोल पंप बंद असल्याच्या अफवा वाढल्याने वाहनधारकांकडून पेट्रोल भरण्यासाठी झुंबड उडाली आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपावरचे पेट्रोल संपले आहे.
वसई
वसई पेट्रोल पंपावर वाहनधारकांचा हंगामा पाहयला मिळाला. पेट्रोल मिळणार नसल्याने वसईतील पेट्रोल पंपावर मोटारसायकल धारकांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. रात्री 9 वाजता पेट्रोल पंप बंद झाल्याने रांगेत असलेल्या वाहनधारकांनी एकच हंगामा करीत पेट्रोल पंप चालू करा अशी घोषणाबाजी केली. 4 तासापासून आम्ही पेट्रोलच्या रांगेत उभे आहेत, आमच्या गाडीत पेट्रोल नाही, पंप चालु करा, आमच्या सोबत लाहान मुलं आहेत अशी मागणी ही वाहनधारकानी केला आहे.
लातूर
ट्रक आणि टँकर चालकांच्या बेमुदत संपामुळे लातुर जिल्ह्यात देखील मोठा परिणाम झाला असून दुपारपासुनच पेट्रोल, डिझेलसाठी पेट्रोल पंपावर रांगाच रांगा लागल्या होत्या. मात्र आता लातूर जिल्ह्यात पेट्रोलसाठी आटापीटा करावा लागत आहे.
वाचा - Maratha Reservation : अयोध्येला जाणार का? मनोज जरांगे पाटील यांनी एका वाक्यात दिलं उत्तर
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केली आहे. पेट्रोल टँकर चालवणारे चालक देखील या संपात सहभागी होणार असल्याने पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेता वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केली आहे. मात्र सर्वच पेट्रोल पंपावर पुरेसा साठा असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. वरिष्ठ स्तरावर हा संप होऊ नये यासाठी काळजी घेतली जात असून या संपातही पुरवठा सुरळीत राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र सध्या तरी जिल्हा व शहरातील सर्वच पंपावर पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी उसळली आहे. नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर शाळा- महाविद्यालय उद्या पुन्हा एकदा सुरू होणार असून त्यामुळे पालक देखील या संपाने चिंतेत आहेत.
धारशिव
पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला असल्याच्या बातम्या कालपासून माध्यमांमध्ये सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंप बंद राहण्याच्या भीतीपोटी वाहनधारक पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पंपांवर रांगा लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. धारशिव शहरात तुफान गर्दी पेट्रोल-पंपावर पाहायला पाहायला मिळत असून पेट्रोल डिझेल घेण्यासाठी दु चाकी चालक व चार चाकी चालक गर्दी व गोंधळ करताना दिसत आहेत आज मध्यरात्रीपासून पेट्रोल डिझेल पंप बंद झाल्यावर उद्या पेट्रोल डिझेल मिळणार नाही या भीतीपोटी गर्दी करत असल्याचं वाहन चालक सांगत आहेत.