TRENDING:

महाराष्ट्र प्रदुषण न‍ियंत्रण मंडळाची धडक कारवाई, मुंबईत 19 आरएमसी प्लांट केले बंद

Last Updated:

संजय गांधीनगर, सायन, मुंबई येथील तीन अनध‍िकृत मेटल प्रोसेस‍िंग भट्टया असलेल्या उद्योगांना कारखाना बंद करण्याचे न‍िर्देश देण्यात आले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून प्रदुषणाची समस्या वाढतच चालली आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील (एमएमआर) वायु प्रदुषण न‍ियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदुषण न‍ियंत्रण मंडळाने 19 आरएमसी प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वायु प्रदूषण न‍ियंत्रण न‍ियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
News18
News18
advertisement

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये (एमएमआर) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (MPCB) एकूण ३२ ठिकाणी सतत वातावरिण वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे (CAAQMS) कार्यरत असून त्यापैकी १४ केंद्रे मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यान्वित आहेत तर उर्वर‍ित पर‍िसर  ठाणे, कल्याण, नवीमुंबई, पनवेल येथे कार्यरत आहेत. या तपासणी केंद्राद्वारे वातावरणीय हवा गुणवत्ता निर्देशांक(Real time AQI) मोजला जातो आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेत स्थळावर नियमितपणे समीर ॲप मार्फत प्रसारित केला जातो.

advertisement

याव्यतिरिक्त सतत हवा गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी मंडळाकडे एकूण २२ मोबाईल मॉन‍िटरींग व्हॅन कार्यरत आहेत. ज्याद्वारे संपूर्ण राज्यामध्ये गरजेनुसार वातावरणीय हवा गुणवत्ता तपासणी केली जाते. सदरील व्हॅनचा उपयोग हवा प्रदूषण-प्रवण हॉटस्पॉट क्षेत्रे तसेच RMC आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये हवा प्रदूषण तपासणीसाठी केला जातो व न‍ियमीत मानकांचे उल्लंघन आढळून येणा-या संबंधित प्रकल्पांवर पर्यावरण विषयक कायद्यातंर्गतची कार्यवाही केली जाते.

advertisement

·म.प्र.न‍ि. मंडळाने ऑक्टोबर 2025 मध्ये राज्यातील आरएमसी प्लान्ट उद्योगांकरीता सुधारीत मार्गदर्शक सुचना जारी केल्या होत्या. त्याबाबत त्याच्या अमंलबजावणीचे सर्वेक्षण मंडळाच्या अध‍िकाऱ्यांमार्फत सुरू आहे.

सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने देवनार, गोवंडी क्षेत्रातील चार आरएमसी उद्योगांना (मे. ओम गेहलोत ऑपरेटर, मे. एनसीसी ल‍ि., मे. रामकी इन्फ्रास्ट्रक्चर ल‍ि., मे. एनए कन्ट्रक्शन प्रा. ल‍ि.) कारखाना बंद करण्याचे न‍िर्देश देण्यात आलेले आहे आणि तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाख रुपये बँक हमी जप्त करण्यात आली आहे.

advertisement

संजय गांधीनगर, सायन, मुंबई येथील तीन अनध‍िकृत मेटल प्रोसेस‍िंग भट्टया असलेल्या उद्योगांना कारखाना बंद करण्याचे न‍िर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपाल‍िकेमार्फत सदर भट्टया न‍िष्कासीत करण्यात आलेल्या आहेत.

वडाळा- माहुल येथील सर्वेक्षणादरम्यान एमबीपीटी रस्त्याच्याकडेने काही ठ‍िकाणी संध्याकाळच्या वेळी कचरा जाळला जात असल्याचे आढळून आल्याने, सदरबाबत तात्काळ प्रत‍िबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राध‍िकरणाला न‍िर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सर्वेक्षणात ठाणे येथील 8, नवी मुंबई येथील 6 तर कल्याण येथील 1 आरएमसी प्लान्ट न‍िर्देशांचे उल्लघन केले असल्याने बंद करण्यात आले आहेत. याप्रकारे एमएमआर क्षेत्रात एकुण 19 आरएमसी उद्योगावर या प्रकारे उत्पादन बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरील ब्युटी टिप्स वापरताय? तर आताच थांबा ही सवय,डॉक्टरांनी दिला सल्ला
सर्व पहा

मुंबई महानगर प्रादेश‍िक क्षेत्रातील वायु प्रदूषण न‍ियंत्रणाकरीता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक मोह‍िम हाती घेतली असून न‍िर्देशीत न‍ियमांचे अनुपालन न करणा-या उद्योगांवर बंदची कारवाई केली असून या पुढेही ही सर्वेक्षणाची मोह‍िम सातत्याने कार्यरत राह‍िल असा व‍िश्वास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष स‍िध्देश कदम यांनी व्यक्त केला आहे. मंडळाचे सदस्य सच‍िव एम. देवेंदर स‍िंह हे दैनंद‍िन सर्वेक्षणाचा अहवाल घेत असून यामध्ये उद्योगाने सहकार्य करावे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
महाराष्ट्र प्रदुषण न‍ियंत्रण मंडळाची धडक कारवाई, मुंबईत 19 आरएमसी प्लांट केले बंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल