राज्यातील थंडीत अंड्याचा बाजार कडाडला
थंडीत दिवसात आहारातील सकस आहार म्हणून अंड्यांना जास्त पसंती मिळते. त्यामुळे या दिवसांत मागणी वाढून पुरवठा कमी पडतो आणि त्यामुळे अंड्यांचे दर अचानक वाढतात. यंदाच्या वर्षीही अशीच स्थिती दिसत आहे आणि राज्यभर अंड्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
सध्या बाजारात अंड्यांची मागणी जास्त असून पुरवठा कमी आहे, यामुळे बाजारात अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अंड्यांचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
advertisement
जाणून घ्या अंड्यांचे दर?
मुंबईतील अंधेरी लोखंडवाला हा येथे डझन अंडी 100 रुपयांना मिळत आहेत तर वांद्रे आणि भांडुप परिसरात 94 ते 96 रुपयांना मिळत आहेत. या शिवाय मुंबई शहरील उपनगरात जसं की, बोरिवली, मुलुंड आणि नवी मुंबईत सुमारे 90 रुपये दर आहे. व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार नाताळपर्यंत मागणी आणखी वाढेल आणि दर 110-120 रुपये प्रती डझनपर्यंत जाऊ शकतो.
लोखंडवाला येथील एका ब्रेडक्राफ्ट बेकरीचे सुरेश पासवान यांनी सांगितले की,''पूर्वी अंडी साधारण 80-84 रुपयांना होती. पण आता आम्ही अंडी विकत घेण्यासाठी जातो तेव्हा पॅकेजिंगसह आमचा खर्च 94 रुपयांपर्यंत जातो. ख्रिसमसपर्यंत एका अंड्याचा दर 10 रुपये होईल अशी पेक्षा आहे.
