जाहिरात कशी हवी तर ती देवाभाऊसारखी...
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कामाचं कौतूक केलं अन् चांगल्या धोरणाची प्रसिद्धी देखील चांगली करा, असं सांगितलं. त्यावेळी अजित पवार फडणवीसांवर घसरले. जाहिरात कशी हवी तर ती देवाभाऊसारखी... असं अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी फडणवीसांच्या चेहऱ्यावर देखील हसू फुललं. कुणी काहीही म्हणो पण जाहिरात अशीच व्हायला हवी, असं सांगत फडणवीसांनी विषयावर पडदा टाकला.
advertisement
मुंबई मनोरंजन आणि पर्यटन क्षेत्राची राजधानी
दरम्यान, बैठकीत मुंबईला मनोरंजन आणि पर्यटन क्षेत्राची राजधानी बनविण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकताना उद्योग विभागाने तयार केलेल्या ऑनमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) धोरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उद्योग विभागाकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या धोरणाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर त्यातील कल्पना आणि तरतुदी आणि योजनांचे मंत्रिमंडळानं तोंडभरून कौतुक केलं.