दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज?
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंत्री महोदय बिझी असल्याने राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक उशिरा आज पार पडली. मात्र, या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित असल्याचं दिसून आलं. कालच्या महापालिकेच्या निकालानंतर आता दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज आहेत की काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. मुंबई सोडती तर इतर ठिकाणी शिवसेनेला धक्का बसल्याचं पहायला मिळालं. भाजपमुळे शिवसेनेला नवी मुंबईसह इतर ठिकाणी देखील फटका बसलाय. अशातच आता मुंबईतील एका घटनेमुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
अजित पवार बारामतीमध्ये आहेत. तिथं एका प्रदर्शनात अजित पवार व्यस्थ आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर नगरसेवक फुटू नयेत यासाठी हॉटेल पॉलिटिक्समध्ये व्यस्थ आहेत. अशातच आता दोन्ही उपमुख्यमंत्री व्यस्थ असल्याने कॅबिनेटला अनुपस्थित असल्याचं बोललं जातंय.
कॅबिनेट बैठकीपूर्वी अध्यक्षपदाची शपथ
दरम्यान, कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वल्सा नायर सिंग यांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ दिली व यशस्वी कार्यकाळाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
