परदेशी पर्यटकाचे टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास संबंधित पर्यटक ज्या खोलीत राहत होता, त्या खोलीत मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले आढळून आले. ही बाब लक्षात येताच हॉटेल प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने जखमी पर्यटकाला उपचारासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या त्या पर्यटकाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप समजले नाही.
advertisement
हा प्रकार आत्महत्येचा प्रयत्न आहे की त्यामागे काही वेगळे आणि गंभीर कारण आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आणि कडक नियंत्रण असलेल्या अशा नामांकित हॉटेलमध्ये अशी घटना घडणे संशयास्पद मानले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. संबंधित परदेशी पर्यटकाची संपूर्ण माहिती, तो भारतात कधी आणि कशासाठी आला होता तसेच हॉटेलमध्ये त्याच्या हालचाली कशा होत्या याचा तपास केला जात आहे. याशिवाय हॉटेलमधील कर्मचारी यांच्याकडून सर्व माहिती घेतली आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच घटनेमागचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
