TRENDING:

यांच्या बापाचे पैसे नाहीत, महापालिका लुटलीय, मतदारांनी खुशाल घ्यावेत, मंदा म्हात्रेंचा नाईक बापलेकावर हल्लाबोल

Last Updated:

भाजप नेत्या, बेलापूरच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी आमदार गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र संदीप नाईक यांच्यावर सडकून टीका केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई : तुमच्या एकाच घरात दोन तिकीट कशी काय? तुमच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली? भाजपसाठी तुमचे योगदान काय? अशा प्रश्नांची सरबत्ती भाजप नेत्या, बेलापूरच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी आमदार गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र संदीप नाईक यांच्यावर केली. कोणत्या बिल्डरकडून किती कमिशन घेता, हे मी वेळ आल्यावर नक्की सांगेन, ते तुम्हाला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
गणेश नाईक-संदीप नाईक-मंदा म्हात्रे
गणेश नाईक-संदीप नाईक-मंदा म्हात्रे
advertisement

बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी ऐरोलीचे भाजपचे उमेदवार गणेश नाईक आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बेलापूरचे उमेदवार संदीप नाईक यांच्यावर सडकून टीका केली.

...तर मग मी दोन वेळा निवडून कशी आले?

बेलापूर मतदारसंघात कामे झाली नाहीत? विकासकामे करण्यासाठी मी सक्षम नाही असे सांगतात. जर मी सक्षम नसते तर दोनवेळा बेलापूरमधून कशी निवडून आले? असा सवाल मंदा म्हात्रे यांनी नाईक यांना विचारला.

advertisement

माझ्या नावाने खोटे पसरवून मला बदनाम केले जाते. अनेकांना पैसे दिले आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीनंतर मी बॉम्ब फोडेन. काहींनी फॉर्म भरले आहेत.गेल्यावेळी पण हेच लोक होते, आताही तेच आहेत. असले उद्योग मला नवीन नाहीत. कुणी कुणाची मते फिरवली हे सगळं माहिती आहे, असेही मंदा म्हात्रे म्हणाल्या.

नाईकांनी कोणत्या बिल्डरकडून कमिशन घेतले, किती घेतले? हे मला माहिती

advertisement

कोणत्या बिल्डरकडून कमिशन घेतले, किती घेतले? हे मला माहिती आहे. नाईकांकडे इतकी संपत्ती कुठून आली? मी जर सगळे तपशील सांगितले तर त्यांना महागात पडेल. वेळ आली की हे सगळं सांगेन, पुढच्या सभेत याविषयी अधिक बोलेन, असेही म्हात्रे म्हणाल्या.

मतदारांनी नाईकांकडून खुशाल पैसे घ्यावेत, यांच्या बापाचे नाहीत, महापालिका लुटलीय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

लोकांना पैसे वाटणे सुरू झाले आहे. यांची सवय म्हणजे एका मतासाठी पाच हजार देणार पण पाच वर्षे काहीही करणार नाहीत. यांनी पैसे दिले तर मतदारांनी घ्यावेत. यांच्या बापाचे पैसे नाहीत. महापालिकेत कमावलेले पैसे घ्या आणि मत कमळाला द्या, असा हल्ला म्हात्रे यांनी नाईकांवर चढवला.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
यांच्या बापाचे पैसे नाहीत, महापालिका लुटलीय, मतदारांनी खुशाल घ्यावेत, मंदा म्हात्रेंचा नाईक बापलेकावर हल्लाबोल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल