रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि इतर अभियांत्रिकी कामे करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. प्रवाशांना दिलासा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण या मुख्य मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही.
1) हार्बर मार्गावरील 'मेगाब्लॉक'
कुठे: कुर्ला ते वाशी स्टेशनच्या दरम्यान, अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर.
advertisement
कधी: सकाळी 11.10 वाजल्यापासून ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत.
ब्लॉकच्या वेळेत, खालील लोकल ट्रेन रद्द राहतील
CSMT मुंबईहून वाशी, बेलापूर किंवा पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल गाड्या सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 दरम्यान बंद राहतील. तसेच, पनवेल, बेलापूर किंवा वाशीहून CSMT कडे जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल गाड्या सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 दरम्यान बंद राहतील.
प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था
ब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी या स्थानकांदरम्यान प्रवाशांसाठी विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान प्रवासासाठी तिकीटाची विशेष परवानगी दिली आहे. यामुळे प्रवाशांना ट्रान्स-हार्बर मार्गाचा फायदा घेता येईल.
2) पश्चिम रेल्वेवरील 'मेगाब्लॉक'
कुठे: बोरिवली ते राम मंदिर स्थानकांदरम्यान, पाचव्या मार्गिकेवर.
राम मंदिर ते कांदिवली स्थानकांदरम्यान, पाचव्या मार्गिकेवर.
कधी: रविवारी सकाळी 10.00 वाजल्यापासून ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत.
या काळात लोकल ट्रेनच्या मार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत.
अप जलद लोकल: बोरिवलीहून अंधेरीकडे जाणाऱ्या सर्व अप जलद लोकल गाड्या, बोरिवली ते अंधेरी दरम्यान अप धीमे मार्गावर चालवण्यात येतील.
पाचवा मार्गावरील लोकल: अंधेरी ते बोरिवली दरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील.
प्रवाशांना विनंती
रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी आणि प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी कृपया या वेळेतील बदल लक्षात घ्या. यामुळे तुमचा प्रवास वेळेत आणि त्रासमुक्त होईल. शक्य असल्यास ब्लॉकच्या वेळेत प्रवास टाळण्याचा किंवा पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा विचार करा.