सर्वसामान्यांचे हक्काचे घर आता आवाक्यात
गेल्या काही दिवसांपासून म्हाडाच्या घरांच्या लॉटरीबाबत चर्चा सुरू होती. अखेर म्हाडा प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. महानगरपालिका निवडणुका आणि आचारसंहिता संपल्यानंतर आता म्हाडाने घरांच्या सोडत प्रक्रियेला वेग दिला आहे.
घरांचे लोकेशन काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मार्च 2026 महिन्यात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुमारे 3 हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. ही घरे मुंबई शहर आणि उपनगरातील विविध भागांमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर ठाणे, नवी मुंबई आणि विरार परिसरात कोकण मंडळाकडून सुमारे 4 हजार घरांची सोडत जाहीर होणार आहे.
advertisement
सविस्तर माहिती म्हाडाकडून लवकरच जाहीर
या सोडतीमुळे मुंबईसह उपनगरात एकूण 7 हजार घरे उपलब्ध होणार असून अनेक नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरांच्या किमती, अर्ज प्रक्रिया, उत्पन्न गट आणि इतर अटींबाबतची सविस्तर माहिती लवकरच म्हाडाकडून जाहीर केली जाणार आहे. म्हाडाची ही सोडत सर्वसामान्यांसाठी सुवर्णसंधी ठरणार असून घर खरेदीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.
