TRENDING:

MHADA Lottery 2025 : गुड न्यूज! तुमचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात, म्हाडा प्राईम लोकेशनवर उभारणार घरं

Last Updated:

MHADA Housing Scheme : म्हाडा पुढील 5 वर्षांत महाराष्ट्रात तब्बल 7 लाख घरांची निर्मिती करणार आहे. या घरांमुळे सामान्य नागरिकांना स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी मिळेल. कोणत्या भागात किती घर मिळणार आहेत त्याची माहिती घेण्यासाठी वाचा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : म्हाडा घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. पुढील साधारण 5 वर्षांत म्हाडा तब्बल 7 लाख घरं बांधण्याचा विचार करत आहे. हे घर सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध असतील. चला तर मग सविस्तर पाहूया कोणत्या भागात आणि कशा प्रकारची घरं सर्वसामान्य व्यक्तींना खरेदी करता येतील आणि त्यासाठी काय अटी असतील.
News18
News18
advertisement

मुंबईत मिळणार परवडणारी घरं

म्हाडाचा पुढच्या 5 वर्षांत तब्बल ७ लाख घरं बांधण्याचा विचार आहे मात्र यापैकी अंदाजे 5.5 लाख घरं फक्त मुंबईत बांधली जातील. या प्रकल्पांचा मुख्य उद्देश घरांची कमतरता दूर करणे तसेच परवडणारी घरं उपलब्ध करणे आणि शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्याचा आहे.

'या' भागात असतील घरं

म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ संजीव जयस्वाल यांनी सांगितले की या घरांची विक्री लॉटरीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सायनमधील जीटीबी कॉलनी, अंधेरीतील एसव्हीपी नगर, गोरेगावमधील मोतीलाल नगर आणि मुंबई सेंट्रलजवळील कामाठीपुरा या भागांमध्ये पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांमुळे पुढील 5 ते 7 वर्षांत मुंबईत 2 लाखांहून अधिक घरं तयार होतील.

advertisement

मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांची कमतरता दररोज जाणवत आहे. शहरात वाढती लोकसंख्या, जलद गतीने होणारे शहरीकरण आणि रिअल इस्टेटच्या वाढत्या किमतींमुळे घरांची मागणी अधिक आहे. म्हाडा या समस्येवर मात करण्यासाठी अनेक क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प राबवत आहे.

थोडक्यात सायनमधील जीटीबी कॉलनी, अंधेरीतील एसव्हीपी नगर, गोरेगावमधील मोतीलाल नगर आणि कामाठीपुरा यांसारख्या प्रकल्पांत मुंबईत पुढील काही वर्षांत 2 लाख घरं बांधली जातील. या प्रकल्पांमुळे मुंबईकरांना परवडणारी घरं मिळण्यास मदत होईल.

advertisement

याशिवाय ठाणे येथील काशीनाथ घाणेकर सभागृहात शनिवारी कोकण क्षेत्रातील 5,354 घरं आणि 77 भूखंडांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांत म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने तीन लॉटरी सोडतीतून 13,500 हून अधिक घरं विकली आहेत. राज्यभरात म्हाडाने गेल्या तीन वर्षांत 18 लॉटरी सोडती काढल्या असून अंदाजे 43,000 घरं विकली गेली आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी जा अन् संध्याकाळी परत या, कल्याणमधील फेमस पिकनिक स्पॉट, तुम्ही पाहिले का?
सर्व पहा

या सर्व उपक्रमांमुळे मुंबई आणि त्यासमोरील भागात घरांच्या कमतरतेवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे. परवडणारी घरं मिळविण्याची संधी लोकांसाठी आता जवळ आली आहे. पुढील काही वर्षांत या प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा घर खरेदीचा स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery 2025 : गुड न्यूज! तुमचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात, म्हाडा प्राईम लोकेशनवर उभारणार घरं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल