खरं तर मिरा भाईंदरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात युती होणार होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या युतीसाठी प्रयत्न झाले होते. पण शेवटी ही युती होऊ शकली नाही. त्यामुळे नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वात भाजपने आणि प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात शिवसेनेने थेट एकमेकांविरूद्ध उमेदवार उभे केले होते. त्यामुळे दोन्ही उमेदवार कडवी झूंज होणार होती.
advertisement
दरम्यान या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकमेकांविरूद्ध अनेक आरोप केले होते.तसेच या निवडणुकीत नरेंद्र मेहता यांनी प्रभाग क्रमांक 16 मधील एकनाथ शिंदे यांचे उमेदवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजू भोईर यांना 'तुला पाडणार' असे आव्हान निर्माण केले होते.खरं तर प्रभाग 16
हा शिवसेनेचा मागच्या 20 वर्षापासूनचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नरेंद्र मेहता यांच्या खुल्या आव्हानानंतर हा गड राखण्याचे प्रताप सरनाईक यांच्यासमोर मोठे आव्हात होते.
पण आता निकालात नरेंद्र मेहता यांनी आपला शब्द खरा करून दाखवत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजू भोईर यांचा पराभव केला आहे, तर भाजप उमेदवार नवीन सिंह यांना जिंकून आणले आहे.त्यामुळे प्रताप सरनाईक यांना मोठा झटका बसला आहे.
प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपचे उमेदवार
अनिता पाटील
प्रतिभा जाट
वंदना भावसार
नवीन सिंह
मिरा भाईंदर महानगरपालिका
एकूण प्रभाग - २४ एकूण जागा - ९५एकूण उमेदवार - ४३५
पक्षनिहाय उमेदवार संख्या
भाजप - ८७ शिवसेना (शिंदे) - ८१राष्ट्रवादी (अजित पवार) - ३३मनसे - ११काँग्रेस - ३२शिवसेना (उद्धव ठाकरे) - ५६राष्ट्रवादी (शरद पवार) - १४वंचित बहुजन आघाडी - ०२बहुजन विकास आघाडी - ०२ (कॅांग्रेस सोबत)रिपाई - ०१ (भाजपासोबत)अपक्ष - ११६
